Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अभिनेता अर्जुन कपूरमुळे येस बँक बुडाली'

येस बँकेवर जवळपास २४ हजार दशलक्ष डॉलर कर्ज आहे.  

'अभिनेता अर्जुन कपूरमुळे येस बँक बुडाली'

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी येस बँकेवर निर्बंध लादले आहे. निर्बंध लादण्यात आल्यानंतर आता, ग्राहकांना येस बँकेच्या अकाऊंटमधून केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहेत. बँकेच्या या स्थितीवर सर्वच स्तरातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. या गंभीर समस्येवर बॉलिवूडकरांनी देखील आपली मतं मांडली आहेत. कमाल खानने देखील याविषयी भाष्य केले आहे. अभिनेता अर्जुन कपूरमुळे बँक बुडाली असल्याचा खोचक टोला त्याने लगावला आहे. 

कमाल खाने ट्विटरच्या माध्यमातून अर्जुन कपूरवर निशाना साधला आहे. 'अर्जुन कपूरने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ते सर्व चित्रपट जवळपास बुडाले आहेत. '२ स्टेट' चित्रपटाने चांगली उंची गाठली होती. या चित्रपटात तो येस बँकेचा कर्मचारी दाखवण्यात आला होता. आता तर येस बँकच बुडाली.' अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं. 

हे ट्विट सध्या चांगलचं व्हायरल होत आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जनहित आणि बँक खातेदारांचे हित लक्षात घेऊन बँकिंग नियम कायदा १९४९ कलम ४५ अंतर्गत निर्बंध लादल्यशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचं आरबीआयने म्हटलंय. बँकेच्या व्यवस्थापनाने, ते निरनिराळ्या गुंतवणूकदारांशी बोलत असून त्यात यशस्वी होण्याची आशा आहे, परंतु विविध कारणांमुळे त्यांनी बँकेत भांडवल ठेवले नसल्याचं सांगितलंय.

अहवालानुसार, येस बँकेवर जवळपास २४ हजार दशलक्ष डॉलर कर्ज आहे. बँकेकडे जवळपास ४० अब्ज डॉलर बॅलेंस सीट आहे. कॅपिटल बेस वाढवण्यासाठी बँकेने २ अब्ज डॉलर चुकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बँकेने SBI, HDFC, LIC आणि AXIS बँककडे आपली ठराव योजना सादर केली. परंतु या योजनेस सहमती मिळाली नाही. ऑगस्ट २०१८मध्ये बँकेचे शेअर्सची किंमत ४०० रुपये इतकी होती. आता आर्थिक संकटामुळे ती ३७ रुपयांच्या जवळपास आहे.

Read More