Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरे मर्यादा ठेव; गर्लफ्रेंड मलायकाचा बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या अर्जुनला कोणी सुनावलं?

तिच्या कमनीय बांध्यावरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या.   

अरे मर्यादा ठेव; गर्लफ्रेंड मलायकाचा बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या अर्जुनला कोणी सुनावलं?

मुंबई : गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्यानं कायमच चर्चां रंगल्या. एकमेकांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून सुट्टीसाठी निवांत ठिकाणी जाण्यापर्यंत या दोघांची एकमेकांना साथ असते.

काही महिन्यांपूर्वीच ही जोडी मालदीवला सुट्टीसाठी गेली होती. धकाधकीच्या कामातून वेळ काढत यानिमित्तानं त्यांनी एकमेकांसोबतचे खास क्षण अनुभवले. याचदरम्यान अर्जुननं त्याच्या प्रेयसीचे म्हणजेच मलायकाचे काही फोटो शेअर केले होते. (Bollywood Actor arjun kapoor shares bold photos of girlfriend malaika arora)

कुठं मलायका सायकलिंग करताना दिसली, तर कुठं तिचा ग्लॅमरस आणि तितकाच बोल्ड लूक पाहायला मिळाला. बीच वेअरमध्ये तिच्या कमनीय बांध्यावरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या. 

पन्नाशीच्या दिशाने वयाचा आकडा वाढतानाच मलायका मात्र त्याचीही तमा बाळगत नसल्याचं त्यावेळीही पाहायला मिळालं. तिचं सौंदर्य पंचवीशीतील तरुणीला लाजवेल असंच होतं. 

fallbacks

अर्जुननं इन्स्टा स्टोरीमध्ये तिचे हे फोटो शेअर केले होते. पण, सर्वांनाच हे फोटो आवडले असं नाही. बरं, ज्यांना हे फोटो आवडले त्यांनी अर्जुनला खडे बोल सुनवायलाही मागेपुढे पाहिलं नाही.  

'अरे ती तुझी होणारी पत्नी आहे. तिचा काहीतरी मान ठेव...' असं म्हणत मलायकाच्या अर्जुनने पोस्ट केलेल्या बोल्ड फोटोंवर अनेकांनीच प्रतिक्रिया दिल्या. अर्जुननं मात्र या प्रतिक्रियांकडे फारसं लक्ष न देता आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याची वेगळ्याच मार्गानं प्रशंसा करणं सुरुच ठेवलं. 

Read More