Marathi News> मनोरंजन
Advertisement

Anushka Sharma च्या 'त्या' फोटोची मैत्रीणीनेच उडवली खिल्ली, पाहा असं काय आहे त्या फोटोत...

असा एक फोटो अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) मैत्रीणीनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Anushka Sharma च्या 'त्या' फोटोची मैत्रीणीनेच उडवली खिल्ली, पाहा असं काय आहे त्या फोटोत...

Anushaka Sharma: मैत्रीत रूसवेफुगवे, राग, खिल्ली आणि भांडणं होणं अगदी स्वाभाविकच आहे. पण त्याचसोबतच मजा मस्ती करणं आणि आपली सुखदुःख शेअर करणं यापेक्षा मैत्रीत दुसरं सुख नाही. सध्या इन्टाग्रामनं आपलं आयुष्य खूपच सोप्पं केलं आहे आपण आपल्या मित्र मैत्रीणींसोबत व्यक्तीत केल्या आठवणी शेअर करू शकतो. असा एक फोटो अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) मैत्रीणीनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांचे मनं जिंकून आहे. ती दररोज तिच्या लुकमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते. सध्या तिचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

इन्स्टाग्रामवर अनुष्काची मैत्रिण कनिका कार्विनकोप (Kanika Carwincop) हिने गोव्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो 2004 मधला आहे. फोटोमध्ये अनुष्काने टँक टॉपसोबत डेनिम जीन्स घातल्याचे दिसत आहे. त्यावेळी अनुष्काचे वय जवळपास 16 वर्ष असावे. 

तुम्हाला आठवतंय का 2000 च्या काळात फॅशन खूप वेगळी होती तेव्हा एक असाही ट्रेण्ड होता जेव्हा मुली पातळ भुवयाही ठेवायच्या. अनुष्काच्या भुवयाही या फोटोत पातळ दिसत आहेत. तेव्हा हा फोटो शेअर करताना कनिकाने अनुष्काची तिच्या पातळ भुवयांना घेऊन खिल्ली उडवली आहे. हा फोटो शेअर करताना अनुष्काच्या मैत्रीणीनं काय लिहिलंय पाहा...  

fallbacks

अनुष्का तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. अनुष्का लवकरच चकडा एक्सप्रेस (Chakda Express) या चित्रपटातून दिसणार आहे, या चित्रपटात भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी हिची भुमिका अनुष्का करणार आहे. 

Read More