Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचा फोटो घेणाऱ्या Paparazzi ला पती असं काही म्हणाला, ऐकूनच भरली धडकी

असं फार क्वचितच होतं.  

अभिनेत्रीचा फोटो घेणाऱ्या Paparazzi ला पती असं काही म्हणाला, ऐकूनच भरली धडकी

मुंबई : कलाकार जिथं जातील त्या ठिकाणी त्यांची एक झलक टीपण्यासाठी सतत छायाचित्रकारांचा गराडा पाहायला मिळतो. हॉटेल म्हणू नका, एखादा कार्यक्रम म्हणू नका किंवा मग विमानतळ, अर्थात एअरपोर्ट म्हणू नका. एखादा कलाकार दिसला आणि छायाचित्रकारांची गर्दी झाली नाही, असं फार क्वचितच होतं.

सध्याही मुंबई विमानतळावर असंच चित्र पाहायला मिळालं. जिथे अभिनेता अंगद बेदी आणि त्याची पत्नी, अभिनेत्री नेहा धुपिया विमानतळामध्ये जाण्यासाठी म्हणून त्यांच्या कारमधूल उतरले. 

नेहमीप्रमाणे त्यावेळी तिथं असणाऱ्या छायाचित्रकारांनी अंगदला आवाज दिला. त्यांनी अंगदचे काही फोटोही काढले. 

पुढे मॅडमसोबत फोटो काढायचा आहे, असं त्यांनी अंगदला सांगितलं. ज्यावर आज मॅडमचा मूड जरा खराब आहे... असं तो छायाचित्रकारांना सांगताना दिसला. 

अंगदनं दिलेला हा इशारा पाहून छायाचित्रकारांनीही नेहाकडे भीतीपोटीच असावं पण, फोटोचा आग्रह धरला नाही. 

मॅडम सर म्हणताहेत की तुमचा मूड ठीक नाही.. असं त्यापैकी एकजण नेहाला म्हणाला. त्यावर सरांनाच विचारा काय ते.... असं उत्तर नेहानं दिलं. 

नेहा आणि अंगदचे काही फोटो टीपल्यानंतर छायाचित्रकारांनी त्यांना मोठ्या आपुलकीनं सीऑफ केलं. 

कलाकार आणि छायाचित्रकारांमध्ये असणाऱं एक अव्यक्त नातं यावेळी पाहायला मिळालं. 

मुळात सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेसाठी जबाबदार असणाऱ्या काही घटकांमध्ये या छायाचित्रकारांचाही मोलाचा वाटा असतो. 

याच कारणामुळे कायमच बहुतांश सेलिब्रिटी या मंडळींशी असणारं हे खास नातं जपताना दिसतात. 

नेहा धुपिया आणि अंगद बेदी या जोडीनं कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येसुद्धा त्यांनी काही कोणाला दरडावलेलं नाही. पण, नेहाचा मूड पाहता तिचं नेमकं काय बिनसलं हा प्रश्न मात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. 

Read More