Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ठग्स...'ने पार केलं कमाईचं शतक

हा आकडा तुम्हालाही थक्क करेल, कारण...

'ठग्स...'ने पार केलं कमाईचं शतक

मुंबई : चित्रपटाच्या यशाची गणितं ही गेल्या काही दिवसांपासून बदलली आहेत. याचा प्रत्ययही अनेकदाच आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं कळत आहे. 

अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाने १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयची माहिती दिली. 

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला होता. ज्यानंतर हे आकडे वाढतच गेले. समीक्षकांकडून ठग्सला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही प्रेक्षकांनी मात्र या चित्रपटाला किंबहुना त्याच्या स्टारकास्टला पसंती दिल्याचं कळत आहे. 

विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, आता येत्या काळात या चित्रपटाचा गल्ला आणखी वाढतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

Read More