Marathi News> मनोरंजन
Advertisement

Raveena Tandon: 'मी अशी अभिनेत्री आहे जिने रेप सीन...', रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यातच आता एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील बॉडीशेमिंगवरचा किस्सा शेअर केला आहे.

Raveena Tandon: 'मी अशी अभिनेत्री आहे जिने रेप सीन...', रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

Raveena Tandon On Shaming: अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tandon) बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हटलं जातं. रवीनाच्या अदांचे लोक आजही फॅन आहेत. मात्र नुकतंच एका मुलाखतीदरम्यान रविनाने 90 व्या दशकातील चित्रपटसृष्टीतील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यावेळी बऱ्याच चित्रपटात बोल्ड सीन्स, किसिंग सीन्स तसेच आयटम नंबर्सचा भाडिमार असायचा. तरी या सगळ्यांमध्ये राहून रविनाने स्वत: चं वेगळंपण कसं सिद्ध केलं यावर तिने भाष्य केलं. 

रवीना टंडनचे वडील रवी टंडन (Ravi Tandon) तेव्हाचे मोठे दिग्दर्शक होते त्यामुळे तिला सिनेसृष्टीत स्ट्रगल करावा लागला नाही. मात्र त्यावेळी रवीनाने बॉडीशेमिंगचा सामना केला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये लोकांचे टोमणे ऐकलेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने याबद्दल सांगितलं. 90च्या दशकात तिला कोणकोणत्या गोष्टींवरून टोमणे मारले जायचे हे तिने सांगितलं. तिने त्या पत्रकार महिलांचं वर्णनही केलं ज्या तिच्या शरीराच्या विशिष्ट भागावर लिहीत तीची खिल्ली उडवायच्या.

वाचा: कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार!

यावर रविना म्हणाली की, “मला तेव्हा बऱ्याच गोष्टी पटायच्या नाहीत, जर एखादी डान्स स्टेप मला खटकली तर मी त्याबद्दल लगेच बोलून दाखवायचे. शिवाय मी स्विमिंग कॉस्च्युम परिधान करण्यास तसेच किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. मी एकमेव अशी अभिनेत्री आहे जीने रेप सीन दिला पण त्यात माझे कपडे फाटलेले तुम्हाला दिसणार नाही. मी तशी अटच घालायचे, यामुळे मला प्रचंड घमेंड आहे असं बऱ्याच लोकांना वाटायचं.”  

यानंतर रवीना म्हणाली, 'मला खूप काही म्हटलं गेलं. माझ्या मांड्यांवर कमेंट केली. तिच्या मांड्या किती मोठ्या आहेत, 'थंडर थाइज' आहेत असं म्हटलं गेलं. ही नव्वद किलोची आहे. मी 16 व्या वर्षी काम सुरू केलं होतं. तेव्हा मी जाड होते. मला आता त्याचा काही फरक पडत नाही. मला मी जशी आहे तसंचं राहायला आवडतं.' तसेच शिवाय ९० च्या दशकातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील काही खटकणाऱ्या गोष्टींमुळे चित्रपटातून ब्रेक घेतल्याचंही रविनाने स्पष्ट केलं. 

Read More