Marathi News> मनोरंजन
Advertisement

राजघराण्याची वारस आहे बी- टाऊनची 'ही' सौंदर्यवती

तिच्या काही भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. 

राजघराण्याची वारस आहे बी- टाऊनची 'ही' सौंदर्यवती

मुंबई : राजकन्या, राजकुमार, राजा, राणी, राजमहाल या संज्ञा अनेकदा आपण गोष्टीतून ऐकल्या आहेत. मुळात या गोष्टी ऐकता ऐकता आपण लहानाचे मोठे झालो. वय वाढलं असलं तरीही मनात त्या राजकन्येप्रमाणेच आपलंही आयुष्य असावं, तिच्याप्रमाणे आपलाही थाट असावा असं अनेकींना वाटलं असेल. 

राजेशाही थाट अनुभवत किंबहुना राजघराण्यातीलच एक सदस्य असणारी अशीच एक व्यक्ती, सौंदर्यवती बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

तिचं नाव आहे, अदिती राव हैदरी. दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अदितीने 'दिल्ली ६' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

'ये साली जिंदगी' या चित्रपटातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. 'भूमी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमधील भूमिकांमुळेही तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. 

fallbacks

हैदराबादमधील राजघराण्याची वारस 

राजघराण्याची वारस असूनही अदिती कधीच तिच्या कुटुंबाच्या नावाचा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी करत नाही. 

ती हैदराबादचे राजा अकबरी हैदरी यांची पणती आणि आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर यांची भाची आहे. 

अदितीची आई, विद्या रावसुद्धा राजघराण्यातील सदस्य आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अदिती राजघराण्याची वारस असणारी सेलिब्रिटी आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

अदितीची आतापर्यंतची वाटचाल पाहता येत्या काळात आपल्या अभिनयाच्या बळावर ती प्रेक्षकांच्या मनावर अशीच अधिराज्य गाजवत राहील, असंच म्हणावं लागेल. 

Read More