Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bipasha Basu Pregnancy : बिपाशा बसूने प्रेग्नेंसीवर सोडलं मौन, म्हणाली ''करण आणि मी...''

बॉलीवूडमधील बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे जोडपं चर्चेचं केंद्र बनलं आहे.

 Bipasha Basu Pregnancy : बिपाशा बसूने प्रेग्नेंसीवर सोडलं मौन, म्हणाली ''करण आणि मी...''

मुंबई : बॉलीवूडमधील बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे जोडपं चर्चेचं केंद्र बनलं आहे. अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी तिने शेअर केली. यादरम्यान, अभिनेत्रीने सर्वप्रथम तिच्‍या गरोदरपणावर मौन सोडलं आणि धक्कादायक अनेक खुलासे केले.  

बिपाशा बसूला हवी आहे मुलगी 
बिपाशाने तिच्या ताज्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिला आणि करणला मुलगी हवी आहे. करण आणि मी सुरुवातीपासूनच स्पष्ट होते की, आम्हाला एक मूल हवं आहे. मी याचा कधी इतका विचारच केला नाही की, इतका उशीर का झाला किंवा वेळ का लागला? माझा विश्वास आहे की, जेव्हा आपल्याला आपलं स्वतःच मूल असाव अस वाटल होत. आम्ही अभिव्यक्तीवर विश्वास ठेवतो. जेव्हापासून आपल्याला मूल हव होतं तेव्हापासूनच आम्ही मुलाची अपेक्षा करु लागलो.

वयाच्या ४३ व्या वर्षी बिपाशा तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. गरोदरपणाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मला माहित आहे की बाळ ही एक सुंदर भेट आहे. आणि आपण कोणत्याही लिंगाचा स्वीकार केला पाहिजे.  परंतु आम्ही आमच्या बाळाला 'ती' म्हणतो. आमचा विश्वास आहे की, ती मुलगी आहे. आणि जेव्हापासून आम्ही मूल होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आमचा विश्वास आहे.'

प्रेग्नेंसीनंतर कामावर परतेन!
गर्भधारणा आणि पालकत्वाविषयी बोलताना, तिने बाळाच्या जन्मानंतर अभिनेत्री कधी कामावर परत येणार हे देखील सांगितलं. बिपाशा म्हणाली, ''मी प्रेग्नंसीनंतर लवकरच कामावर परतेन. महिलांनी आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र असणं महत्त्वाचं आहे. आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. मग जोडीदार येईल की नाही, काही फरक पडत नाही. करिअर घडवा आणि मग प्रेम, लग्न आणि मुलं व्हायची असतील तर ती होतीलच.

लग्नानंतर 6 वर्षांनी पालक होणार 
बिपाशा आणि करण यांची पहिली भेट २०१५ मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल 2016 मध्ये त्यांच्या नात्याचं लग्नात रुपांतर केलं. आता जवळपास 6 वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपं पालक बनणार आहे.

Read More