Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bigg Boss 15 : ट्रॉफीची संधी सोडली आणि 10 लाखाची बॅग उचलली, घराबाहेर पडला हा स्पर्धक

Bigg Boss 15 Finale: 5 पैकी आणखी एक स्पर्धकाने सोडलं घर, पाहा कोण आहे हा स्पर्धक? 

Bigg Boss 15 : ट्रॉफीची संधी सोडली आणि 10 लाखाची बॅग उचलली, घराबाहेर पडला हा स्पर्धक

मुंबई : बिग बॉस 15 च्या महाअंतिम सोहळ्याचा निकाल काही क्षणात येण्याची शक्यता असताना मात्र एक मोठी बातमी समोर येत आहे. एका स्पर्धकाने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. 10 लाख रुपयांनी भरलेली बॅग की ट्रॉफी असा प्रश्न समोर होता. या स्पर्धकानं 10 लाख रुपयांची बॅग उचलून घर सोडलं आहे. 

'बिग बॉस 15' ग्रँड फिनालेमध्ये निशांत भटने 10 लाख रुपयांची बॅग भरून सर्व स्पर्धकांचा निरोप घेतला. त्याने असा निर्णय घेणं इतर स्पर्धकांसाठी अनपेक्षित होतं. 
आता शोमध्ये 4 स्पर्धक आहेत त्यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल हे 'तिकीट टू फिनाले' चे विजेते आहेत. यापैकी एकालाच शोची ट्रॉफी मिळणार आहे. 

बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शहनाजला स्टेजवर बोलावताना दिसत आहे. स्टेजवर येताच शहनाजच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने सिद्धार्थच्या काही आठवणींना उजाळा दिला. सिद्धार्थच्या आठवणींत सगळेजण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Read More