Marathi News> मनोरंजन
Advertisement

BIG BOSS 11 च्या अंतिम सोहळ्याआधी टीमला बसला 'हा' मोठा झटका !

बिग बॉस 11 चा आज अंतिम सामना रंगणार आहे.

BIG BOSS 11 च्या अंतिम सोहळ्याआधी टीमला बसला 'हा' मोठा झटका !

मुंबई : बिग बॉस 11 चा आज अंतिम सामना रंगणार आहे.

शिल्पा शिंदे, विकास गुप्ता, हीना खान आणि पुनीष शर्मा या चौघांमध्ये अंतिम लढत रंगणार आहे. मात्र अंतिम सोहळ्याच्या दरम्यान 'बिग बॉस 11 च्या टीमला एक मोठा झटका लागला आहे.  

नेमके झाले काय ? 

बिग बॉस 11 हा कार्यक्रम पहिल्या दिवसांपासूनच चर्चेमध्ये होता. शोसोबत असलेले वाद विवाद आणि सलमान खानच्या करिष्म्यामुळे बिग बॉसचा 11 वा सीझन टीआरपीच्या लिसटमध्येही दमदार कामगिरी करत होता. मात्र अंतिम ट्प्प्यात असलेल्या बिग बॉसची मागील आठवड्यात पीछेहाट झाली आहे.  

बिग बॉस 11 मागील आठवड्यात टॉप 10 च्या यादीतून बाहेर पडला आहे. टीआरपीच्या यादीत बिग बॉस 12 व्या क्रमांकावर आहे.  

तारक मेहता अव्वलस्थानी 

BARC ने जाहीर केलेल्या यादीनुसार टीआरपीच्या यादीमध्ये बिग बॉस 11 12 व्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यामुळे या शोचं अंतिम आठवड्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात थोडी कमतरता असल्याचं दिसून आलं आहे. 

टीआरपी लिस्ट मध्ये सब टीव्हीवरील ' तारक मेहता...'  ही मालिका अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ झी टीव्हीवरील 'कुंडली भाग्य' आहे. 

BARC टीआरपी लिस्टनुसार मालिकांचं रॅंकिंग 

1. तारक मेहता का उल्टा चश्मा (Sony sab): 6961
2. कुंडली भाग्य (ZEE TV): 6930
3. सुपर डांसर चैप्टर 2 (Sony TV): 6495
4. कुमकुम भाग्य (Zee TV): 6464
5. ये रिश्ता क्या कहलाता है (Star plus): 6356
6. शक्ति-अस्तित्व के अहसास की (Colors): 5975
7. ये है मोहब्बतें (Star plus): 5862
8. स्टार स्क्रीन अवॉर्ड 2018 (Star plus): 5846
9. उड़ान (Colors): 5665
10. इश्म में मर जावां (Colors): 5614
11. आशिकी  (Colors): 5560
12. बिग बॉस 11 (Colors): 4804

Read More