Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या खुणा; चाहते म्हणाले; "जया बच्चन..."

बिग बींनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या खुणा दिसत आहेत

अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या खुणा; चाहते म्हणाले;

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांचे फोटो शेअर करत असतात. सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. अलीकडेच बिग बींनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या खुणा दिसत आहेत. बिग बींचा हा फोटो त्यांच्या एका महिला चाहत्याने शेअर केला आहे. फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की बिग बींनी पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि डोळ्यांवर चष्मा घातला आहे. बिग बींच्या चेहऱ्यावर लिपस्टिकच्या खुणा आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिले आहे, 'अरे... देवी जी... हसायला जागा सोडा!'. बिग बींचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. बिग बींच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'देवी जी कोण आहेत, जया जींना कदाचित माहित नसेल', तर दुसऱ्याने लिहिले, 'कोणत्या देवीकडून?'. बिग बींचा हा फोटो 2020 मधला आहे, ज्यामध्ये त्यांनी फिल्टर वापरला होता. त्याचवेळी, आता त्यांनी एका महिला चाहत्याच्या संदेशासह हा फोटो पुन्हा शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन लवकरच अयान मुखर्जींच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, नागार्जुन, आलिया भट्ट आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहेत.

Read More