Marathi News> मनोरंजन
Advertisement

गोविंदा स्टाईलने डान्स करणारे डब्बू अंकल सलमानच्या भेटीला...

गोविंदा स्टाईलने डान्स करणारे मध्य प्रदेशातील डब्बू अंकल रातोरात लोकप्रिय झाले.

गोविंदा स्टाईलने डान्स करणारे डब्बू अंकल सलमानच्या भेटीला...

मुंबई : गोविंदा स्टाईलने डान्स करणारे मध्य प्रदेशातील डब्बू अंकल रातोरात लोकप्रिय झाले. यांचा डान्स नेत्यांपासून सेलिब्रेटीजपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरला. डब्बू अंकल उर्फ संजीव श्रीवास्तव यांनी अलिकडेच बॉलिवूडचा दंबग खान सलमान खानची दस का दमच्या सेटवर भेट घेतली. 

या भेटीचे फोटोज त्यांनी ट्विटरवर शेअर केले. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, मी माझ्या परिवारासह दस का दमच्या सेटवर सलमान भाईची भेट घेतली.

fallbacks

डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डब्बू अंकलची लोकप्रियता इतकी वाढली की इंश्योरेंस कंपनीच्या एका जाहिरातीसाठी त्यांना साईन करण्यात आले. त्याचा व्हि़डिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला. व्हि़डिओ पोस्ट करत डब्बू अंकलने लिहिले की,  Bajaj Allianz सोबत काम करुन मजा आली. माझे पहिले कमर्शिअल. Bajaj Allianz च्या समझो हो गया गाण्यावर डान्स करुन मज्जा आली. सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. 

fallbacks

४६ वर्षांचे संजीव मध्यप्रदेशातील विदिशा येथे राहतात. ते भाभा युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहेत. लहानपणापासूनच डान्सची आवड असलेल्या संजीव श्रीवास्तव यांनी अनेक स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवली आहेत. 
सोशल मीडियावर संजीव अंकलच्या डान्सला चांगलीच पसंती मिळाली. त्यांचे व्हिडिओज लाखो लोकांनी पाहिले आहेत. तर अनेकांनी ते शेअर केले आहेत. 

fallbacks

 

Read More