Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सांगा गोला कोणासारखा दिसतो...', भारतीच्या गोंडस लेकाचा चेहरा अखेर समोर

Bharti Singh कडून चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण, लेकाचा गोंडस फोटो पोस्ट करत म्हणाली...  

'सांगा गोला कोणासारखा दिसतो...', भारतीच्या गोंडस लेकाचा चेहरा अखेर समोर
Updated: Jul 12, 2022, 09:31 AM IST

मुंबई :  क्यूटनेसच्या बाबतीत विनोदवीर भारती सिंगचा लेक गोला देखील अनेक स्टार किड्सच्या स्पर्धेत उतरला आहे. अखेर, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांचा मुलगा लक्ष्य, ज्याला ते प्रेमाने गोला म्हणतात, याचा गोंडस चेहरा चाहत्यांना दाखवला. सध्या सर्वत्र भारतीच्या लेकाची चर्चा आहे. गोला म्हणजेच लक्ष लिंबाचिया 3 महिन्यांचा झाला आहे. भारतीने चाहत्यांना दिलेल वचन अखेर पूर्ण केलं आहे. गोला तीन महिन्यांचा झाल्यानंतर अखेर भारती आणि हर्षने लेका चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 

लक्ष्यचा चेहरा पाहिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी चिमुकल्यावर आशीर्वादांसह प्रेमाचा वर्षाव केला आहे. सध्या लक्ष्यचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, भारतीने प्रेग्नेंसी दरम्यान आणि बाळाला जन्म देण्यापर्यंत सर्व माहिती चाहत्यांपर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून पोहोचवली आहे. भारती आणि हर्षने मुलाचा चेहरा दाखण्यासाठी सर्व तयारी केली होती. घर पूर्णपणे सजवले होते. 

गोल्यासाठी खास एक मोठा बॉक्स मागवला होता, त्यात भारतीने लेकाला ठेवलं होतं. त्यानंतर अनबॉक्स करत लेकाचा चेहरा चाहत्यांना दाखवला. भारतीचा लेक प्रचंड गोंडस दिसत आहे. 

भारती सिंगने तिच्या रोजच्या ब्लॉगच्या माध्यमातून गोलाची झलक दाखवली आहे. संपूर्ण ब्लॉगमध्ये, गोलावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. वडील हर्षसोबतही त्याचे चांगले बाँडिंग पाहायला मिळाले आहे. 

ब्लॉग शेअर करताना भारतीने चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे, मला सांगा गोला कोणासारखा दिसतो.. आई की वडिलांसारखा...', आता तुम्ही फोटो बघून लगेच हे उत्तर द्या.