Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री भारती सिंगच्या अडचणीत वाढ; NCM ची दाढी-मिशीच्या कमेंटवर कारवाई

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा व्हिडिओ तिच्यासाठी सतत अडचणीचा ठरत आहे

अभिनेत्री भारती सिंगच्या अडचणीत वाढ; NCM ची दाढी-मिशीच्या कमेंटवर कारवाई

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहचा व्हिडिओ तिच्यासाठी सतत अडचणीचा ठरत आहे.  ज्यामध्ये ती दाढी आणि मिशीची खिल्ली उडवत आहे. आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. भारती सिंगच्या विरोधात आयोगाकडे तक्रार आली आहे. आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा यांनी याची दखल घेत पंजाब आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवून अहवाल मागवला आहे.

भारती सिंह यांच्यावर आहेत हे आरोप 
भारती सिंह यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भारती यांनी केलेली कमेंट विनोद शीख समुदायाबद्दल अपमानास्पद असल्याचा दावा लोकांनी केला. मात्र, भारती सिंहनेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून, कोणत्याही समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. असं सांगितलं. त्याबद्दल तिने माफीही मागितली आणि तिच्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नये. अशी विनंती सर्वांना केली.

भारती सिंहने माफीही मागितली आहे
भारती सिंहने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शीख समुदायाची माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणाली आहे की, 'मी कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही किंवा कोणत्याही पंजाबीची खिल्ली उडवली नाही. मी माझ्या मित्रासोबत कॉमेडी करत होते, पण जर एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागते. मी स्वतः पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरमध्ये झाला आणि मी तिचा नेहमीच आदर करते. मला पंजाबी असल्याचा अभिमान आहे.

दाढी-मिशीवर केली ही कमेंन्ट
खरंतर भारती सिंग तिच्या एका शोदरम्यान अभिनेत्री जस्मिन भसीनसोबत बोलताना दिसत आहे. यादरम्यान, दाढी-मिशीवर भाष्य करताना भारती म्हणाली, 'तुम्हाला दाढी-मिशी का नको? दाढी आणि मिशीचे मोठे फायदे आहेत. दूध प्या, मग अशी दाढी तोंडात घाला, याला शेवयाची टेस्ट येते. माझ्या अनेक मैत्रिणींची लग्नं झाली आहेत. जे दिवसभर दाढीतून उवा काढत राहतात.

Read More