Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Bahubali' फेम राणा दग्गुबतीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेता करतोय या गंभीर आजाराशी सामना

राणा दग्गुबती 'बाहुबली' सिनेमात 'भल्लालदेव'ची भूमिका साकारून घराघरांत पोहचला. साऊथ सिनेस्टार राणा दग्गुबती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. राणा डग्गुबतीने अलीकडेच त्याच्या चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का दिला आहे. 

'Bahubali' फेम राणा दग्गुबतीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेता करतोय या गंभीर आजाराशी सामना

मुंबई : साऊथ सिनेस्टार राणा दग्गुबती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याला सिनेसृष्टीत राणा म्हणून ओळखलं जातं, तो एक भारतीय अभिनेता, निर्माता, व्हिज्युअल इफेक्ट को-ऑर्डिनेटर आणि फोटोग्राफर आहे. त्याने तेलुगु सिनेमा व्यतिरिक्त तमिळ आणि हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्याच्या उत्कृष्ट  अभिनयासाठी तो नेहमी चर्चेत असतो. व्हिज्युअल इफेक्ट निर्माता म्हणून, राणाने महेश बाबूची भूमिका साकारत, सैनीकुडू या तेलगू चित्रपटासाठी २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा राज्य नंदी पुरस्कार मिळाला होता.

राणा दग्गुबती 'बाहुबली' सिनेमात 'भल्लालदेव'ची भूमिका साकारून घराघरांत पोहचला.  राणा डग्गुबतीने अलीकडेच त्याच्या चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का दिला आहे.

उजवा डोळा काम करत नाही...!
राणा दग्गुबती (Rana Daggubati Bahubali Movie) याने 2016 मध्ये पहिल्यांदा त्याच्या उजव्या डोळ्याच्या समस्येबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. खरंतर एका मुलाने त्याची गोष्ट एका तेलगू चॅट शोमध्ये रडत सांगितली होती. त्यानंतर मुलाला गप्प करत राणा म्हणाला की, ' मी फक्त माझ्या डाव्या डोळ्यानेच पाहू शकतो, माझा उजवा डोळा काम करत नाही' तसंच राणा दग्गुबती  (Rana Daggubati Hindi Movies) पुढे म्हणाला, 'माझा उजवा डोळा दुसऱ्याचा आहे, एका व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर मला नेत्रदान केलं.

याचबरोबर त्याने अजून एक धक्कादायक खुलासा केला आणि म्हटलं की, त्याने किडनीचंही प्रत्यारोपण केलंय! आपल्या शारीरिक समस्यांबद्दल बोलताना राणा दग्गुबती (Rana Daggubati Health) म्हणाला, 'आरोग्यविषयक समस्यांमुळे बरेच लोकं तुटतात. त्याच समस्या बर्‍याच वेळा बऱ्या होतात पण एक विचित्र जडपणा राहतो. राणा पुढे म्हणाला, 'माझं कॉर्नियल ट्रान्सप्लांट झालंय, माझंही किडनी ट्रान्सप्लांट झालंय. मला असं वाटते की मी एक टर्मिनेटर आहे. तरीही मी हार मानत नाही...'

2010 मध्ये त्याने तेलुगू ब्लॉकबस्टर लीडरमधून अभिनयात पदार्पण केलं, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण दक्षिणेसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. बिपाशा बसूच्या विरुद्ध दम मारो दम या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्याच्या अभिनयासाठी त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला.

2012 च्या क्राईम थ्रिलर चित्रपट कृष्णम वंदे जगद्गुरुममधील त्याच्या अभिनयासाठी त्याला समीक्षकांकडूनही खूप प्रशंसा मिळाली. 2015 मध्ये, त्याने बाहुबली: द बिगिनिंगमध्ये मुख्य निगेटीव्ह रोल साकारला होता, ज्यामध्ये भारतीय चित्रपटासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.  

Read More