Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांना गमावलं, सोशल मीडियावर फोटो शेअर केला

सोशल मीडियावर व्यक्त केली भावना 

मराठमोळ्या अभिनेत्रीने वडिलांना गमावलं, सोशल मीडियावर फोटो शेअर केला

मुंबई : गुरूवारी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने (Bhagyashree Limaye)आपल्या दुःखाला वाट करून दिली आहे. यासाठी तिने सोशल मीडियाची मदत घेतली आहे. भाग्यश्रीचे वडिल माधव लिमये याचं निधन झालं असून भाग्यश्रीने याची माहिती दिली आहे. Rest in Peace Baba म्हणत भाग्यश्रीने आपल्या बाबांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. (Bhagyashree Limaye father passes away after battling a prolonged illness) भाग्यश्रीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करून आपण तुझ्या दुःखात सहभागी असल्याचं सांगत सांत्वन केलं आहे. 

यामध्ये सुव्रत जोशी, शशांक केतकर, सुबोध भावे, स्पृहा जोशी, श्रृती मराठे यासारख्या अनेक कलाकारांनी भाग्यश्रीला आधार दिला आहे. तिच्या दुःखात सहभागी झाले आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, भाग्यश्रीचे वडिलांवर दीर्घ आजाराने सोलापुरात उपचार सुरू घेत होते. या अभिनेत्रीभोवती तिचे कुटुंब आणि जवळचे मित्र आहेत. अभिनेत्री आणि तिच्या पालकांच्या काही सुंदर आठवणी येथे पहा ...

घाडगे आणि सून या मालिकेतून भाग्यश्रीने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. भाग्यश्रीने २०१७ मध्ये ‘घाडगे & सून’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. त्यापूर्वी २०१४ मध्ये तिने ‘श्रावण क्वीन’चा किताब जिंकला होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती आयटी कंपनीत नोकरी करत होती.

मधल्या काही काळात भाग्यश्री आणि भूषण प्रधान यांच्या रिलेशनशिपची चर्चा देखील झाली. 

Read More