Marathi News> मनोरंजन
Advertisement

वेब सीरिजमध्ये 'अंगूरी भाभी'कडून सर्व मर्यादा पार, अभिनेत्यासोबत बोल्डसीन पाहिल्यानंतर...

वेब सीरिजमधील 'अंगूरी भाभी'च्या बोल्ड सीनने सर्वांना केलं थक्क...  

वेब सीरिजमध्ये 'अंगूरी भाभी'कडून सर्व मर्यादा पार, अभिनेत्यासोबत बोल्डसीन पाहिल्यानंतर...

मुंबई : 'भाभी जी घर पर हैं' (Bhabi Ji Ghar Par Hain) मालिकेतून 'अंगूरी भाभी' भूमिकेला न्याय देत अभिनेत्री शिल्पा शिंदेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाळी. मालिकेनंतर चाहते शिल्पाला तिच्या नावाने नाही तर 'अंगूरी भाभी' म्हणून ओळखू लागले. मालिकेत साध्या गृहिणीच्या भूमिकेत दिसणाऱ्या शिल्पाने एका वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन देत सर्वांना थक्क केलं. 

'पौराशपूर' (Paurashpur) सीरिजमध्ये तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. सीरिजमध्ये ती राणी मीरीवती यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसली. सीरिजमध्ये तिच्यासोबत अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण ट्रांसजेंडरच्या भूमिकेतून चाहत्याच्या भेटीस आला. 

55 वर्षीय मॉडेलवर अनेक मुली फिदा आहेत. पण जेव्हा मिलिंदनेच हे रुप घेतलं तेव्हा अनेकांना धक्का बनला होता.  कपाळावर टिकली आणि अंगावर अलंकार , लांब मोकळे केस असा लूक मिलिंदने केला होता. 

'पौरशपूर' सीरिजची कथा
'पौरशपूर' ही एक पीरियड ड्रामा वेब सीरिज आहे. ज्यामध्ये प्रेम, वासना आणि एकमेकांप्रति असलेला राग दाखवण्यात आला आहे. या सीरिजमध्ये शिल्पा आणि मिलिंद शिवाय  अन्नू कपूर (Annu Kapoor),शहीर शेख (Shaheer Sheikh) आणि फ्लोरा सैनी (Flora Saini) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read More