Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Maharani 2' चं टीझर रिलीज; आता पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा

Maharani 2 : हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत असलेली प्रसिद्ध वेब सिरीज महाराणीच्या पुढच्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. यात सोहम शाह 'भीमा भारती'च्या भूमिकेत दिसतोय, जो स्वतःची पत्नी राणी भारती विरोधात उभा आहे. राजकीय कथांच्या या लढाईत कोण बाजी मारणार, हे येणारा काळच सांगेल.

'Maharani 2' चं टीझर रिलीज; आता पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा

Maharani 2 : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या (Huma Qureshi) आगामी वेब सिरीज 'महाराणी 2' (Maharani 2) चा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये सोहम शाह पुन्हा एकदा भीम भारतीच्या भूमिकेत राजकारणातील एक तगडा खेळाडू दिसत आहे. 'महाराणी 2'मध्ये सोहम शाह गेल्यावेळेप्रमाणे राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये सोहम शाह (Sohum Shah) एका जाहीर सभेला संबोधित करताना बोलतोय की, “हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था, हमारी तो कश्ती वहां डूबी जहां पानी कम था.”

या डायलॉगने भीमा भारती आपली पत्नी आणि मुख्यमंत्री राणी भारती विरुद्ध जनतेला वळवताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्या वेळी सीरीजमध्ये राजकीय डावपेच मोठ्या पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुन्हा एकदा सीरीजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भीम भारतीच्या भूमिकेत दिसणारा सोहम शाह त्याच्या पत्नीच्या विरोधात दिसत आहे. साहजिकच, या राजकारणाच्या युद्धात भीमा भारती आणि राणी भारती यांच्यात लढत होणार आहे.

सोनी लिव्हच्या 'महाराणी' या वेबसिरीजच्या शेवटच्या सीझनला लोकांच भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर आता या सीरीजचा दुसरा सीझन लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. राजकीय कथांच्या या लढाईत कोण जिंकणार? पती-पत्नीमधील राजकीय लढाई कोणतं वळण घेणार याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

Read More