Marathi News> मनोरंजन
Advertisement

आत्महत्येपूर्वी सुशांतनं Google वर नेमकं काय सर्च केलं?

त्या एका घटनेनंही सुशांत बिथरला होता  

आत्महत्येपूर्वी सुशांतनं Google वर नेमकं काय सर्च केलं?

मुंबई : Sushant Singh Rajput  सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीला आता आणखी एक नवं वळण मिळालं आहे. हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आथा दर दिवसाआड एक नवं वळण मिळू लागलं आहे. ज्यामध्ये आता सुशांतनं त्याच्या आत्महत्येपूर्वी नेमकं इंटरनेटवर काय सर्च केलं होतं, याचा खुलासा झाला आहे. 

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतच्या एका अहवालातील माहिती सर्वांपुढे मांडली. ज्यामध्ये गुगलवर सुशांतनं आठवड्यातून तीन वेळा त्याचं स्वत:चं नाव सर्च केलं होतं. जवळपास दोन तासांसाठी त्यानं हा शोध घेतला. ज्याशिवाय त्यानं बायपोलर डिसऑर्डरचाही शोध घेतल्याची माहिती समोर आली. 

१४ जूनला सुशांतनं आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं स्वत:बाबतची काही माहिती वाचली. शिवाय सुशांतची मॅनेजर असणाऱ्या दिशा सॅलिअन हिच्या नावाचं सर्चही त्यानं केलं. दिशाच्या आत्महत्या प्रकरणाशई आपलं नाव वारंवार जोडलं जाण्याच्या घटनेचाही त्याला जबर धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळं तो वारंवार याच गोष्टी सर्च करत होता. सुशांतनं आत्महत्या करण्याच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी दिशानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं.

गुगलच्या मदतीनं स्वत:चं नाव, दिशाचं  नाव आणि मानसिक आजारांविषयीची माहिती शोधणाऱ्या सुशांतच्या मनात त्यावेळी नेमके कोणते विचार सुरु होते ही बाब अद्यापही अस्पष्ट. पण, त्याच्या मनात मात्र असंख्य विचार आणि भावनांचा काहूर होता, ज्यामुळं त्यानं धस्का घेतला होता ही बाब समोर येत आहे

Read More