Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाबा रामदेवांचा दीपिका पदुकोणला अजब सल्ला

दीपिकाला 'या' गोष्टीची गरज 

बाबा रामदेवांचा दीपिका पदुकोणला अजब सल्ला

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. याचे पडसाद देशभर पसरले. या हल्याविरोधात देशभरात आंदोलन देखील करण्यात आले. जेएनयूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सहभागी झाली होती. दीपिकाचं असं जेएनयूमध्ये जाणं काही जणांना खटकलं होतं. त्यानंतर तिच्या जाण्याचं राजकारण करण्यात आलं. आता यावर योगगुरू बाबा रामदेव यांनी दीपिकाला एक अजब सल्ला दिला आहे. 

दीपिकाच्या जेएनयू जाण्यानंतर तिच्या 'छपाक' सिनेमाला कडाडून विरोध होत आहे. या दरम्यान मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी दीपिकाला अजब सल्ला दिला आहे. 

बाबा रामदेव म्हणाले की,'सामाजिक, राजकारण आणि सांस्कृतिक मुद्यांची योग्य समज मिळवण्यासाठी दीपिका पदुकोणला माझ्यासारखा कुणी सल्लागार ठेवण्याची गरज आहे.' पुढे बाबा रामदेव म्हणाले की,'दीपिकामध्ये अभिनयाची दृष्टी आहे. ही वेगळी गोष्ट आहे. मात्र सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्यांवर ज्ञान मिळवण्यासाठी तिला देशाबद्दल अधिक गोष्टी वाचल्या पाहिजेत. समजून घेतल्या पाहिजेत. हे समजून घेण्यासाठी तिला मोठे निर्णय घ्यायला हवेत. याकरता तिला माझ्यासारख्या सल्लागाराची गरज आहे.' 

CAA वर बाबा रामदेव म्हणाले की,'ज्या लोकांना CAA चा अर्थ देखील माहित नाही. ते लोकं या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकरता अपशब्द वापरत आहेत.'

Read More