Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बाहुबली' फेम अभिनेत्रीला होती मृत्यूची भीती, कारण...

तिनं रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता

'बाहुबली' फेम अभिनेत्रीला होती मृत्यूची भीती, कारण...

मुंबई : संपूर्ण जगभरात कहर करणाऱ्या coronavirus कोरोनाचा विळखा सेलिब्रिटी विश्वालाही बसला. अनेक कलाकारांना या विषाणूचा संसर्ग झाला. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून अर्जुन कपूरपर्यंत अनेकांनाच कोरोनाची लागण झाली.

'बाहुबली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेक्री तमन्ना भाटिया हिच्या नावाचाही यातच समावेश. कोरोनाचा संसर्ग झाल्याचं लक्षात येताच तिनं रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं तिनं कोरोनावर मात केली. 

कोरोनावर मात केल्यानंतर तमन्नानं तिचा प्रवास सर्वांशी शेअर केला. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिनं याबाबतची माहिती दिली. ज्यावेळी तमन्नावर कोरोनाचा उपचार सुरु होता त्यावेळी तिचा मृत्यूची भीती सतत सतावत होती. याचविषयी सांगताना ती म्हणाली, 'उपचार सुरु होते त्यावेळी मी फार घाबरले होते. सतत मला मरणाची भीती वाटत होती. माझ्यामध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं आढळली होती. ज्यामुळं अनेकांचा जीवही गेला आहे. पण, डॉक्टरांमुळं मी बचावले. मी माझ्या आई- वडिलांचेही आभार मानू इच्छिते'. 

fallbacks

 

कोरोनाशी झुंज दिल्यानंतर आपल्याला आयुष्याची खरी किंमत कळल्याचं ती म्हणाली. इतकंच नव्हे, तर आता आपण आयुष्य अधिक खुलेपणानं जगत असल्याचंही ती म्हणाली. एकिकडे तमन्ना कोरोनातून सावरली आणि तिथं तिच्या आई- वडिलांनाही या विषाणूची लागण झाली. कोरोनातून सावरलेली असतानाही आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती विलगीकरणातच राहणार असून, आता काही काळ ती स्वत:चीच काळजी घेणार आहे.  

Read More