Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रेम आणि विरह दाखवणारे बागी २ चे नवे गाणे प्रदर्शित...

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या बागी २ सिनेमातील अजून एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. 

प्रेम आणि विरह दाखवणारे बागी २ चे नवे गाणे प्रदर्शित...

नवी दिल्ली : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या बागी २ सिनेमातील अजून एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. लो सफर असे बोल असलेल्या हे सुंदर रोमांटिक गाणे आहे. यात रोनी आणि नेहातील प्रेम व विरह झळकतो. 

टायगर-दिशाचे फॅन्स नक्कीच खूप उत्सुक

हे गाणे पाहण्यासाठी टायगर-दिशाचे फॅन्स नक्कीच खूप उत्सुक असतील. हे गाणे जुबिन नौटियाल याने गायले आहे. तर मिथूनने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यापूर्वी या सिनेमाची दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. एकात दोघेही पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत तर दुसऱ्या गाण्यात टायगर-दिशाचा रोमांटिक अंदाज पाहायला मिळाला.

पहा बागी २ चे नवे गाणे...

 

अॅक्शनपॅक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बागी २ हा अॅक्शनपॅक असून बागी या २०१६ मध्ये आलेल्या सिनेमाचा हा सिक्वल असून त्यात श्रद्धा आणि टायगरची जोडी पाहायला मिळाली होती. बागी २ च्या प्रदर्शनापूर्वीच बागी ३ ची घोषणा करण्यात आली आहे. बागी ३ चे शूटींग डिसेंबर २०१८ पासून सुरू होईल.तर बागी २ हा सिनेमा ३० मार्च २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Read More