Marathi News> मनोरंजन
Advertisement

अतिशय बोल्ड स्वरूपात दिसणार अतुल कुलकर्णी

एकाचवेळी 2 अभिनेत्रींसोबत करणार बेड सीन 

अतिशय बोल्ड स्वरूपात दिसणार अतुल कुलकर्णी

मुंबई : मराठी सिनेमांप्रमाणेच बॉलिवूड सिनेमांतही आपलं वेगळंपण टिकवणारा अभिनेता अतुल कुलकर्णी. रंग दे बसंती, खाकी, चांदनी आणि रईस सारख्या सिनेमांतून अतुल कायम वेगवेगळ्या रुपात भेटला. आता अतुल अतिशय बोल्ड सिनेमांवर काम करत आहे. या सिनेमाचं नाव सध्या भरपूर चर्चेत आहे. सिनेमाचं नाव ऐकूनच सेन्सर बोर्डाकडून परवानगी मिळेल की नाही अशा शंका वर्तवली जात आहे. 

fallbacks

दिग्दर्शक काय म्हणाला? 

अमोल काळे दिग्दर्शित थ्रीसम हा सिनेमा अतुल कुलकर्णी करत आहे. ही बॉलिवूडमधील अशी दुसरी स्टोरी आहे ज्यामध्ये थ्रीसमचा उल्लेख आहे. या अगोदर 2016 मधील इश्क जुनून या सिनेमांत थ्रीसम दाखवण्यात आलं असतं. अमोल काळेच्या या सिनेमांत अतुल पेंटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमांत हा पेंटर अगदी मोकळ्या विचारांचा असून या सिनेमांत 3 गोष्टी मुख्य स्वरूपात दिसणार आहेत. आणि त्या म्हणजे इमोशन्स, फायनेस आणि सेक्स या तिन्ही गोष्टी एकाचवेळी या सिनेमांत पाहायला मिळणार आहे. या सिनेमांत अतुलसोबतच किरण थापर आणि सबा सौदागर मेन लीडच्या रोलमध्ये असणार आहेत. या दोन्ही अभिनेत्री सिनेमांत बहिणीच्या रूपात दिसणार आहे. या सिनेमांत अतुल लग्न झालेला असून त्याच नाव महमूग खान असं आहे.

या सिनेमाबाबत अतुल काय म्हणतो? 

अतुल पहिल्यांदा अशा बोल्ड स्वरूपात दिसणार आहे. अतुल म्हणतो की, अशा प्रकारची बोल्ड भूमिका करताना मला कोणतीच लाज वाटत नाही. एक अभिनेता म्हणून मी आव्हान म्हणून ही भूमिका साकारत आहे. या सिनेमाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सेंसर बोर्ड देखील या सिनेमाला विरोध करू शकते. 

Read More