Marathi News> मनोरंजन
Advertisement

अथियाच्या लग्नासाठी सुनील शेट्टीची जोरदार तयारी; जाणून घ्या कधी वाजणार सनई चौघडे

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आता आणखी एक भव्य लग्न पार पडणार आहे.

अथियाच्या लग्नासाठी सुनील शेट्टीची जोरदार तयारी; जाणून घ्या कधी वाजणार सनई चौघडे

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे, अशा परिस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आता आणखी एक भव्य लग्न पार पडणार आहे. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा सुप्रसिद्ध सुपरस्टार सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर बॉयफ्रेंड केएल राहुलबद्दल.

या वर्षाच्या अखेरीस हे कपल लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. या दोन जोडप्यांच्या लग्नाबाबत बराच काळ चर्चा सुरू होती. पण दरम्यान, एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे कपल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. ज्याची तयारी सिनेस्टार सुनील शेट्टीने सुरू केली आहे.

याचा खुलासा करत मीडिया हाऊसच्या एका सूत्राने सांगितलं आहे की, 'सुनील शेट्टी आपली मुलगी अथियाच्या लग्नाबद्दल खूप भावूक आहे. शेट्टी कुटुंबातील हे ब-याच वर्षांनी पार पडणारं लग्न आहे. म्हणूनच प्रत्येक वडिलांप्रमाणे सुनील शेट्टीलाही प्रत्येक गोष्ट परफेक्ट बनवायची आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या लग्नाची तयारी त्याने आतापासूनच सुरू केली आहे. सुनील शेट्टीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी उत्तम हॉटेल्स, कॅटरर्स आणि डिझायनर्स बुक केले आहेत.

अधिक माहिती देत सूत्रानं सांगितलंय की, 'मुलगी अथियाच्या निवडीमुळे सुनील शेट्टी खूप खूश आहेत. केएल राहुल शेट्टी हा कुटुंबातील एक परिपूर्ण जोड आहे आणि तो आपल्या कुटुंबाचा भाग होण्याने तो खूप आनंदी आहे. हा विवाह मोठ्या थाटात होणार आहे. दोघांचं लग्न मुंबईतील जुहू येथील हॉटेलमध्ये होण्याची शक्यता आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वांना आमंत्रित केलं जाईल. केवळ बॉलीवूडच नाही तर केएल राहुलच्या जवळच्या क्रिकेटपटूंनाही आमंत्रित केलं जाणार आहे. जेणेकरुन ते कपलला आशीर्वाद देऊ शकतात.

सुत्रांनी सुनील शेट्टीच्या इच्छेबद्दल बोलताना पुढे सांगितलं की, "बॉलिवुडने बऱ्याच काळापासून भव्य लग्न पाहिलं नाही. आणि खुद्द सुनील शेट्टीलाही आपली मुलगी अथियाच्या लग्नात सगळ्यांनी हजेरी लावावी अशी इच्छा आहे. त्यामुळे हे लग्न खूप मोठ्या प्रमाणावर होईल. अथिया तिच्या आजोबांच्या खूप जवळची आहे आणि तिच्या नातीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. अशा प्रकारे सुनील शेट्टी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणार आहे.

Read More