Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पुरूषांचे भारीपण कोणी दाखवणार नाही' अशोक सराफ यांचा सवाल

Ashok Saraf on Baipan Bhari Deva: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. त्यातून आता यावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. 

'पुरूषांचे भारीपण कोणी दाखवणार नाही' अशोक सराफ यांचा सवाल

Ashok Saraf on Baipan Bhari Deva: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यातून या चित्रपटानं आतापर्यंत कोट्यवधी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक हीट चित्रपट ठरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद येताना दिसतो आहे. हा चित्रपट सध्या तरूणाईसोबतच पुरूषवर्गही पाहताना दिसत आहेत. त्यामुळे महिलांवर्गांप्रमाणेच पुरूषवर्गही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यांच्याकडूनही नानाविध सकारात्मक प्रतिक्रिया येतायत. हा चित्रपट सध्या भारतासह भारताबाहेरही प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अशोक सराफ उपस्खित होते आणि त्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचे उद्धाटन केले होते. आता त्यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

सध्या माध्यमांमध्ये त्यांच्या एका वक्तव्याची चर्चा आहे. ''बाईपण काय भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण पुरूषांचं भारीपण कोणी दाखवणार नाही. आपली दु:ख, त्रास, आर्थिक संकटं ते कधीच कोणासमोर उलडगताना दिसत नाहीत गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातायत असं त्यांचे वक्तव्य हे सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहे.'' असं अशोक सराफ म्हणाले आहेत. सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे. 

हेही वाचा - हैद्राबादमध्येही 'बाईपण भारी देवा' हाऊसफुल्ल! बॉलिवूड अभिनेत्रीनं शेअर केला Video; म्हणाली, ''आजकाल चांगले सिनेमे...''

ते सविस्तरपणे म्हणाले की, ''बाईपण काय भारी आहे हे दाखवायला लोक पुढे येतील. पण पुरुषांचं भारीपण कोणीही दाखवणार नाही. पुरुषांचं भारीपण हे नकळत ठरलं जातं आणि ते फक्त जाणवून घेण्यापर्यंतच असतं. त्याचा कुणी गवगवा करत नाही कधी. स्त्रिया आपल्या मनातल्या भावभावना, दु:ख मैत्रिणींसमोर किंवा नवऱ्यासमोर व्यक्त करत असतात. पण पुरुष मंडळी यावर कायम मौन बाळगून असतात. आपली दुःख, त्रास, आर्थिक संकटं ते कधीच कोणासमोर उलगडताना दिसत नाहीत आणि त्यावर कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत. गप्प राहून ते या त्रासाला सामोरे जातात.''

सध्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

Read More