Marathi News> मनोरंजन
Advertisement

Asha Bhosle : मुलं होणं हे स्त्रियांसाठी 'ओझं' का ठरतं? आशा भोसलेंच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले पाहा

Asha Bhosle in Conversation with Gurudev  : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांची गणना आशा भोसले यांच्या नावाशिवाय अपूर्णच. बऱ्याच काळापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत जी आजही लोकांना ऐकायला आवडतात.  

Asha Bhosle : मुलं होणं हे स्त्रियांसाठी 'ओझं' का ठरतं? आशा भोसलेंच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले पाहा

Asha Bhosle in Conversation with Sri Sri Ravi Shankar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वयिका आशा भोसले यांचे नाव संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. या झगमगत्या जागतिक त्यांनी सात दशकांहून अधिक उत्कृष्ट आणि अगणित काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील खोडकर आणि रोमँटिक गाणी गाऊन इंडस्ट्रीट स्थान तयार केले आहे. याचदरम्यान दिग्गज गायिका आशा भोसले यांनी अध्यामिक गुरूच्या यूट्यूब चॅनेलवर श्री श्री रविशंकर यांच्याशी गप्पा मारताना घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि  वैवाहिक जीवनाबद्दल यावर चर्चा केली.   

दिग्गज गायिका आशा भोसले यांनी घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सांगितले की, त्यांच्या वैवाहिक जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही त्यांनी संबंध संपुष्टात आणण्याचा विचार केला नाही. अध्यामिक गुरूच्या यूट्यूब चॅनेलवर श्री श्री रविशंकर यांच्याशी गप्पा मारताना, गायकाने सांगितले की, प्रेमाची कल्पनाच काळानुरूप बदलली आहे आणि नातेसंबंध त्यांचे पावित्र्य गमावत आहेत.  

त्यानंतर आशा भोसले पुढे म्हणाल्या, “मी ९० वर्षांची स्त्री आहे, माझे लग्न झाले आणि तीन मुले झाली. जेव्हा वैवाहित काळात काही अडचणी आल्या तेव्हा मुलांना माझ्या आईच्या घरी घेऊन जायचे. पण मी कधीही घटस्फोटासाठी अर्ज केला नाही. पण आजकाल दर महिन्याला घटस्फोटाच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. हे का होत आहे? आशा भोसले यांच्या या प्रश्नावर रविशंकर यांनी विनोद केला की जुन्या पिढ्यांनी कठीण काळात तिच्याकडे वळावे असे संगीत होते. ते म्हणाले की आजकाल लोक अधिक आत्मकेंद्रित आणि ठिसूळ झाले आहेत आणि अविचारी निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे. 

आशा भोसले पुढे म्हणाले, “मी चित्रपटसृष्टीत इतकी वर्षे घालवली आहेत,  मी अनेकांना पाहिले, पण ते आजकालच्या तरुण पिढीसारखे कठोर निर्णय घेणार नाहीत. ते सहजपणे प्रेमातून बाहेर पडतात. ” यावर रविशंकर म्हणाले, लोक अनेकदा आकर्षणाला प्रेम समजतात आणि जेव्हा ते कमी होते तेव्हा ते नातेसंबंध संपवतात. "ते फक्त स्वतःचा विचार करतात. आमच्या काळात असे नव्हते. आमचे सर्व लक्ष इतरांचे आदर करण्यावर आणि त्यांच्या भावना दुखावण्याकडे असायचे. लोकांनी ही संवेदनशीलता गमावली असल्याचे रवीशंकर यावेळी म्हणाले. 

याच मुद्दाला अनुसरून आशा भोसले म्हणाल्या, आजकाल महिलांसाठी मुले होणे हे 'ओझे' बनले आहे. “फक्त गरीबांमध्ये नाही तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकही मुले होण्याबद्दल संकोच करतात… मी वयाच्या 10 व्या वर्षी गाणे सुरू केले आहेत, मला तीन मुले आहेत, मला नातवंडे आणि नातवंडेही आहेत. पण आजकाल लोकांना असे वाटते की मुले झाल्यामुळे त्यांच्या समस्या वाढतात. 

Read More