Marathi News> मनोरंजन
Advertisement

Arshad Warsi Birthday: घरोघरी लिपस्टिक विकून पोट भरणारा मुन्नाभाईचा 'सर्किट' 111 कोटींचा मालक कसा झाला?

Arshad Warsi 55th Birthday Today: अभिनेता अर्शद वारसीला आपण सर्वचजण ओळखतो. 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS) या चित्रपटानं अर्शदला एक वेगळी ओळख दिली आहे. आजही त्याची ही ओळख प्रेक्षकांमध्ये कायम आहे. आज अर्शदचा 55 वा वाढदिवस (Arshad Warsi Struggle Story) आहे तेव्हा त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी आत्तापर्यंतचा कधीही न ऐकलेला संघर्ष. 

Arshad Warsi Birthday: घरोघरी लिपस्टिक विकून पोट भरणारा मुन्नाभाईचा 'सर्किट' 111 कोटींचा मालक कसा झाला?

Arshad Warsi Birthday: गेल्या अनेक वर्षांपासून 'सर्किट' म्हणून ज्याची ओळख कायम आहे असा हरहून्नरी विनोदी अभिनेता अर्शद वारसी. बॉलिवूडमध्ये येऊन आपलं करिअर टिकवणं हे प्रत्येका अभिनेत्यापुढील आव्हान असते. प्रत्येक वेळी (Arshad Warsi Networth) कलाकाराला एक वेगळाच संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष अभिनेता अर्शद वारसीलाही चुकला नाही. आज त्याचा 55 वा वाढदिवस आहे.

यानिमित्तानं जाणून घेऊया अर्शदबद्दलचे हे काही न ऐकलेले किस्से! 90 च्या दशकात अर्शद वारसी (Arshad Warsi Comedy) हे नाव प्रचंड गाजलं होतं, तेव्हा एकामागून एक आलेल्या आगळ्यावेगळ्या विनोदी भुमिकांमुळे अर्शद वारसी चांगलाच लक्षात राहिला. (arshad warsi birthday Bollywood actor arshad warsi struggle story from selling lipsticks to munnabhai mbbs role)

'मुन्नाभाई एमबीबीएस' असो, 'गोलमाल' अथवा 'जॉली एलएलबी' नाहीतर 'इश्किया'; या सर्वच चित्रपटांमधून अभिनेता अर्शद वारसी यानं आपल्या अभिनयाचे वेगळेपण प्रेक्षकांना दाखवले आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अर्शद वारसी यांचा संघर्ष (Arshad Warsi Struggle Story) सोप्पा नव्हता.

हेही वाचा - Zapatlela: तात्या विंचू झाला 30 वर्षांचा! सत्यजित पाध्येंनी शेअर केल्या जुन्या आठवणी

आईवडिलांचं छत्र हरपलं 

वयाच्या 14 व्या वर्षीच अर्शद यांच्या डोक्यावरील छप्पर उडालं आणि ते पोरके झाले त्यानंतर त्यातून सावरून त्यांनी आपल्या पोटापाण्याची सोय केली. आपलं शिक्षण पुर्ण करून त्यांनी सेल्समनचा जॉब केला आणि घरोघरी लिपस्टिक्स विकल्या. त्यानंतर आपलं नृत्याचं स्वप्न पुर्ण करत त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. (arshad warsi birthday Bollywood actor arshad warsi struggle story from selling lipsticks to munnabhai mbbs role)

शिक्षण पुर्ण केल्यानंतर असा सुरू केला आपला प्रवास 

सेल्समनचं काम करता करता अर्शद वारसीनं एक डान्स (Arshad Warsi Dance) ग्रुप जॉईन केला. यावेळी त्यानं अनेक डान्स स्पर्धांमधून आपलं डान्स कौशल्य विकसित केलं. 1991 साली अर्शदनं इंडियन डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभाग दर्शवला जी स्पर्धा त्यानं जिंकून दाखविली. ऑसम नावाचा एक डान्स अॅकॅडमी त्यानं सुरू केला. याच डान्स अॅकॅडमीमध्ये त्याची आणि मारिया गोरेटी हिची भेट झाली त्यांनी पुढे लग्न केले. हे लग्न त्याच्यासाठी ठरलं त्यानंतर त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. 1993 साली प्रदर्शित झालेल्या 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटाच्या टायटल सॉन्ससाठी त्यानं श्रीदेवी आणि अनिल कपूर यांनी कोरिओग्राफी शिकवली आणि त्यानंतर त्याला मोठा ब्रेक मिळाला. 

हेही वाचा - जैसलमेरच्या वाळवंटात अवतरली 'अप्सरा'... मादक अदा पाहून भल्याभल्यांचे लक्ष वेधले! 

जया बच्चन यांनी दिला पहिला ब्रेक 

'तेरे मेरे सपने' नावाच्या एका चित्रपटात अर्शद वारसीला महत्त्वाची भुमिका मिळाली. हा चित्रपट हिट झाल्यानंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' (MunnaBhai MBBS) यांसारख्या चित्रपटांतून त्याला मोठा ब्रेक मिळाला आणि त्याची ही सर्किटची भुमिका विशेष गाजली. अर्शद आणि मारियाचे 1999 साली  (Arshad Warsi Wife) लग्न झाले त्यानंतर त्या दोघांनी यशाचे शिखर गाठले. मिडिया रिपोर्ट्सनुसार, आज अर्शद वारसी याच्याकडे 111 कोटी रूपयांची नेटवर्थ आहे. त्यांच्याकडे महागड्या गाड्याही (Arshad Warsi Cars) आहेत. 

Read More