Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोट्यवधींचं घबाड सापडलेल्या अभिनेत्रीच्या कारला अपघात, सध्या ती...

अवैध पद्धतीने कोट्यवधींची माया कमावणाऱ्या अभिनेत्रीचा अपघात, प्रकृतीबाबतची मोठी Update  

कोट्यवधींचं घबाड सापडलेल्या अभिनेत्रीच्या कारला अपघात, सध्या ती...

कोलकाता :  पश्चिम बंगालमध्ये EDकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत राज्यातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरावर छापा टाकून 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आता अर्पिता मुखर्जीच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.  अर्पिता मुखर्जी सुरक्षित असून किरकोळ जखमी झालीय. शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरुन अर्पिता मुखर्जीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. ईडी आता आज अर्पिता मुखर्जीला पीएमएलए कोर्टात हजर करणारेय.

दरम्यान, ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा आकडा फार मोठा आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी टॉलीगंजच्या डायमंड सिटी कॉम्प्लेक्समधील अर्पिता मुखर्जी यांच्या आलिशान घरातून रोख रकमेसह 20 मोबाइल फोनही जप्त केले आहेत. असं  ईडीने सांगितलं आहे.  

fallbacks

अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची सहकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अर्पिता मुखर्जीने बंगाली अभिनेता प्रोसेनजीत आणि जीत यांच्यासोबत मुख्य भूमिकांसह काही सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्री भूमिका देखील पार पाडली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्पिता पार्थ मुखर्जींसोबत अनेकवेळा राजकीय कार्यक्रमांमध्येही दिसली आहे. याशिवाय ती पार्थ चॅटर्जींसोबत प्रचार करतानाही दिसली होती. 

दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीच्या समारंभात दोघे एकत्र दिसले होते. रिपोर्ट्सनुसार, अर्पिता गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण कोलकाता येथे एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहे. 

अर्पिता चटर्जी यांच्याव्यतिरिक्त EDने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केली आहे. 

पश्चिम बंगालमधील SSC घोटाळ्यामध्ये सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. 

Read More