Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवी कपूर या अभिनेत्याला करतेय डेट?

कुणाला डेट करतेय जान्हवी?

जान्हवी कपूर या अभिनेत्याला करतेय डेट?

मुंबई : करण जोहर सध्या आपल्या 'कॉफी विथ करण' च्या सहाव्या सिझनमुळे खूप चर्चेत आहे. कारण या शोमध्ये करण खूप यूनीक अशा जोड्यांना बोलवत आहे. यामुळेच या शोचा टीआरपी देखील वाढताना दिसत आहे. आताच्या शोमध्ये कॉफी विथ करणमध्ये अर्जुन कपूर आणि त्याची बहिण जान्हवी कपूर येत आहे. 

करणने नेहमीप्रमाणे या दोघांना खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. या एपिसोडचा एक प्रोमो देखील समोर आला आहे. ज्यानंतर करण जान्हवी आणि अर्जुनला रॅपिड फायर राऊंडमध्ये खास प्रश्न विचारत आहे. 

यामध्ये करण जान्हवीला विचारतो की, तू ईशान खट्टरला डेट करत आहेस का? नाही असं उत्तर देत जान्हवी तो विषय टाळते. पण अर्जुन सांगतो की, ती डेट करत नाही तर ईशान फक्त तिच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे. त्याने एकदा जान्हवी करता बिल्डींगवरून देखील उडी मारली आहे. 

त्यानंतर जान्हवी अर्जुनला विचारते की, तू कुणाला डेट करत आहेस. त्यावर अर्जुन शांत होतो आणि तेव्हाच जान्हवीला भावाचा पाय खेचण्याची संधी मिळते. हा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More