Marathi News> मनोरंजन
Advertisement

कंडोमची जाहिरात करते आहेस का? विचारत युजर्सने केलं प्रार्थना बेहरेला ट्रोल

अलीकडेच तिने दीपिकाच्या वादग्रस्त बेशरम रंग गाण्यावरही व्हिडीओ शेअर केला होता.

कंडोमची जाहिरात करते आहेस का? विचारत युजर्सने केलं प्रार्थना बेहरेला ट्रोल

मुंबई : 'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prathana Behere) घराघरात पोहचली. या मालिकेत प्रार्थना बेहेरेने ( Marathi Actress Prarthana Behere) नेहा हिची भूमिका साकारत आहे. नेहा आणि यश (श्रेयश तळपदे) (Shreyash Talpade) ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.  अशातच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यामुळे प्रार्थनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

अलीकडेच तिने दीपिकाच्या वादग्रस्त बेशरम रंग गाण्यावरही व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हाही प्रार्थना ट्रोल झाली होती.  यानंतर आज पुन्हा प्रार्थनाने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर काही नेटकऱ्यानी तिला 'तुला नेमकं काय झालंय..? पोटात मळमळतं आहे का..? असे प्रश्न विचारले आहेत.

 या व्हिडीओमध्ये प्रार्थनाने ब्लु रंगाचा स्ट्रीप स्लीव्ह लॉन्ग ड्रेस परिधान केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हावभावांबद्दल बोलायचं झाले तर याआधी इतके बोल्ड हावभाव तिने कधीच दिले नव्हते. काहींना तिचा हा अंदाज आवडलाय मात्र काहींनी अगदी पातळी सोडून तिला ट्रोल केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गोंडस प्रार्थनाचा अचानक बोल्ड अंदाजात दिसून आल्यामुळे तिचे चाहते हडबडले आहेत. अनेकांनी आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओतील प्रार्थनाचे तसले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. काहींनी प्रार्थना असे काही करु शकते.. बरं केलं तर सोशल मीडियावर शेअर करेल अशी काही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे.

इतकंच काय तर एकाने तिच्या आणि तिच्या पतीच्या वैयक्तिक नात्यावर देखील अश्लील भाषेत कमेंट करत एका युजर्सने म्हटलं आहे की,  'तू कामसूत्र काँडमची जाहिरात करते आहेस का? एकीकडे तिच्या भूमिकांवर प्रेम करणारे चाहते आज तिला एका व्हिडीओमुळे तिला अश्लिल भाषेत ट्रोल करताना दिसत आहेत. हे कलाकारांचं दुर्दैव म्हणावं लागेल.

Read More