Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बीचवर बोल्ड अवतार... बिकिनी लुक पाहून चाहते ही घायाळ, पाहा फोटो

अरबाज खानची रूमर्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बीचवर बोल्ड अवतार... बिकिनी लुक पाहून चाहते ही घायाळ, पाहा फोटो

मुंबई : अरबाज खानची रूमर्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जॉर्जिया तिच्या किलर स्टाईलने चाहत्यांना वेड लावत आहे. पुन्हा एकदा जॉर्जियाने तिच्या सौंदर्याचे जादू सोशल मीडियवर पसरवली आहे. जॉर्जिया एंड्रियानीचा बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. फोटोमध्ये जॉर्जिया खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

जॉर्जियाचा बिकिनी लूक

जॉर्जिया अँड्रियानी, सध्या तिच्या कामामुळे दुबईमध्ये असते, तिने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, अभिनेत्रीने दुबई बीचवर तिच्या व्यस्त शेड्यूडमधून वेळ काढत फोटो शूट केलं. जॉर्जियाने फ्रिल्ड फ्रंटसह ब्लॅक बिकिनी ब्रॅलेट घातले आहे आणि ब्लॅक कार्गो जॉगर्सदेखील घातले आहे.

अभिनेत्रीने कमीतकमी मेक-अप करून तिचा लुक पूर्ण केला आणि काळ्या मखमली हेअरबँड घातलेल्या लुकमध्ये पोज देत फोटो शेअर केला आहे.

जॉर्जिया अँड्रियानीने 'कॅरोलिना कामाक्षी' या वेब सीरिजद्वारे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनेत्री जियोर्जिया अँड्रियानी मिका सिंगसोबत त्याच्या म्युझिक अल्बममध्ये 'रूप तेरा मस्ताना' हे सदाबहार गाणे पुन्हा तयार करत म्हणजेच रिक्रियेट गाण्यात दिसली आहे, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

एवढेच नाही तर तो 'लिटल स्टार'मध्ये शाहबाज बादशासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही पाहिले गेले आहे. आता ती लवकरच श्रेयस तळपदेसोबत 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटात दिसणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जॉर्जिया मुळची इटलीची

जियोर्जिया अँड्रियानी एक इटालियन मॉडेल आणि डान्सर आहे. जी अरबाज खानसोबतच्या तिच्या अफेअरमुळे अनेकदा चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट घेतला. त्यांच्या अचानक विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना आश्चर्य वाटले. मात्र, घटस्फोटानंतर दोघेही त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगत आहेत.

Read More