Marathi News> मनोरंजन
Advertisement

Salman Khan शिवाय 'या' सेलिब्रिटींना बंदूक बाळगण्याची परवानगी

आत्मसंरक्षणासाठी 'हे' सेलिब्रिटी बाळगतात बंदूक... वाचा यादी  

Salman Khan शिवाय 'या' सेलिब्रिटींना बंदूक बाळगण्याची परवानगी

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याबाबत एक छोटी गोष्ट देखील वाऱ्या सारखी काही क्षणात सर्वत्र पसरते. काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे भाईजानला आत्मसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे. सलमानच्या आधी अनेक सेलिब्रिटींना आत्मसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर/ पिस्तुल बाळगण्याची परवानगी देण्यात आली. 

महानायक अमिताभ बच्चन
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याकडेही शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. त्यांच्याकडे आत्मसंरक्षणासाठी .32 रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या ब्लॉगवर ही माहिती दिली आहे.

अभिनेत्री सोहा अली खान
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानला केवळ 16 वर्षांची असताना शस्त्र परवाना मिळाला होता. मात्र काही कारणांमुळे वाद झाल्यानंतर अभिनेत्रीचा परवाना रद्द करण्यात आला.

अभिनेता सनी देओल
बॉलीवूड अभिनेता सनी देओल यांच्याकडेही शस्त्र परवाना आहे. सनी देखील आत्मसंरक्षणासाठी स्वतःकडे  रिव्हॉल्व्हर ठेवतात. सनी यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र  परवाना घेतला आहे.

अभिनेत्री पूनम ढिल्लों
अभिनेत्री पूनम ढिल्लोंकडेही बंदुकीचा परवाना आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ती तिच्या घरी शस्त्र  ठेवते. खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत ही माहिती दिली.

 

Read More