Marathi News> मनोरंजन
Advertisement

परीचा नवा टीझर प्रदर्शित...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. 

परीचा नवा टीझर प्रदर्शित...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा परी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. हा चित्रपट सुपर नॅचरल शक्तींवर आधारीत आहे. यात अनुष्का एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक टीझर आणि पोस्टर समोर आले आहेत. मात्र प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. ट्रेलरपूर्वी परीचा अजून एक टीझर प्रदर्शित करण्यात आला. व्हेलेन्टाईन डे चे औचित्य साधत हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काय आहे टीझरमध्ये...?

टीझरमध्ये अनुष्का शर्मा चित्रपटाचा हिरो परमब्रता चटोपाध्यायसोबत टी.व्ही. बघत आहे. तेव्हाच ती परमब्रताला आय लव्ह यू म्हणते. ती असे बोलताच तिला आय लव्ह यू टू असा आवाज ऐकू येतो. जशी ती पुढे जाते तिला तिचाच चेहरा रक्ताने माखलेला दिसतो. ते पाहुन ती घाबरते आणि मागे हटते. तिचा हा लूक नक्कीच भयावह आहे. चित्रपटाचा हा टीझर शेअर करत अनुष्का विचारतेय, तुम्ही माझे व्हेलेन्टाईन व्हाल का?

या दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

हा चित्रपट २ मार्च म्हणजे होळीला प्रदर्शित होईल. चित्रपटाचे ट्रेलर १५ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटाची निर्मिती क्रिआर्ज आणि अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊस द्वारा करण्यात आली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रासित रॉय यांनी केले आहे. 

 

Read More