Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुष्का शर्माचा 'परी' पाकिस्तानमध्ये बॅन

अनुष्का शर्माचा 'परी' हा चित्रपट आज रसिकांच्या भेटीला आला आहे.

अनुष्का  शर्माचा 'परी' पाकिस्तानमध्ये बॅन

पाकिस्तान : अनुष्का शर्माचा 'परी' हा चित्रपट आज रसिकांच्या भेटीला आला आहे.

'परी' हा होळीच्या लॉंग विकेंडला रसिकांच्या भेटीला आल्याने बॉक्सऑफिसवर किती कमाई करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पाकिस्तानात चित्रपट बॅन 

'परी' हा भयपट आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेसोबत निर्मितीची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र पाकिस्तानामध्ये मात्र 'परी' या चित्रपटाला बॅन करण्यात आले आहे. अनुष्काच्या 'परी' वर विराट कोहलीचं खास ट्विट 

काय आहे कारण  ?  

'परी' हा चित्रपट बॅन करण्यामागे काळी जादू आणि इस्लामविरोधी काही मुल्य दाखवली गेल्याचा दावा पाकिस्तानमध्ये करण्यात आला आहे.  

मीडियाची भूमिका काय ? 

पाकिस्थानी न्यूज चॅनल जियो टीव्हीने केलेल्या दाव्यानुसार, चित्रपटामध्ये कुराणातील काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. सोबतच हिंदू मंत्रांसोबत कुराणातील काही गोष्टी एकत्र केल्याने या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे.  

वितरकांनीही मान्य केली सेन्सॉर बोर्डाची भूमिका 

पाकिस्तानमध्ये ज्या प्रेक्षकांनी 'परी' चित्रपटाचे  बुकींग केले आहे. त्यांना चित्रपटाच्या तिकीटाचे पैसे परत केले जातील असे  नुपलैक्स सिनेमाजने त्यांच्या फेसबुकवर पेजवर  जाहीर केले आहे. 

Read More