Marathi News> मनोरंजन
Advertisement

३० वा वाढदिवस अनुष्का विराटसोबत बंगळूरमध्ये करणार सेलिब्रेट...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी सिनेमा सुई धागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

३० वा वाढदिवस अनुष्का विराटसोबत बंगळूरमध्ये करणार सेलिब्रेट...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी सिनेमा सुई धागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर विराट देखील आयपीएलमध्ये व्यस्त आहे. पण वृत्तांनुसार, अनुष्का आपला वाढदिवस विराटसोबतच सेलिब्रेट करणार आहे. अनुष्का १ मे ला ३० वर्षांची होईल. 

येथे करणार सेलिब्रेट

अनुष्का तिचा वाढदिवस विराटसोबत बंगळूरमध्ये साजर करणार आहे. बर्थडेनिमित्त कोणतीही पार्टी होणार नाही तर फक्त परिवारासोबत डिनर करण्याचा यांचा प्लॅन आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरुष्काला एकत्र असा खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे वाढदिवसानिमित्त एकत्र वेळ घालवण्यची संधी ते दवडू इच्छित नाहीत. त्यासाठी अनुष्का २४ एप्रिलला बंगळूरला येईल. बंगळूरमध्ये एक आठवडा विराटसोबत घालवल्यानंतर ती झिरो सिनेमाच्या शूटिंगसाठी अमेरिकेला रवाना होईल. तिथे सुमारे दीड महिना शूटिंग असेल.

या दिवशी होणार झीरो प्रदर्शित

झिरो सिनेमात अनुष्का वैज्ञानिक बनली आहे. हा सिनेमा २१ डिसेंबरला प्रदर्शित होईल. 

Read More