Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ankita Lokhande Pregnancy: अंकिता लोखंडेचा बेबी बंप लपला नाही! पती विकी जैन यानेही दिली अशी साथ

 Ankita Lokhande Flaunts Baby Bump: अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि नवीन लुकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अंकिताचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे खूप जोरदार व्हायरल होत आहेत.  

Ankita Lokhande Pregnancy: अंकिता लोखंडेचा बेबी बंप लपला नाही! पती विकी जैन यानेही दिली अशी साथ

मुंबई : Does Ankita Lokhande Flaunts Baby Bump: अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि नवीन लुकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अंकिताचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे खूप जोरदार व्हायरल होत आहेत. खरंतर, अभिनेत्रीचे हे फोटोज समोर येताच तिच्या प्रेग्नेंसीबाबत चर्चा सुरु झाली आहे.

fallbacks

अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दोघांच्या लग्नाला सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. आता समोर आलेल्या नवीन फोटोंवरून अभिनेत्री गरोदर असल्याची अटकळ बांधली जात आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पती विकी जैनसोबत दिसत आहे. 

fallbacks

निळ्या रंगाच्या साइट कट ड्रेसमध्ये अंकिता नेहमीप्रमाणेच अधिक सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये अंकिता आणि विकी रोमँटिक स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देत असल्याचे दिसून येते. ही छायाचित्रे शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "''आप जैसे हो, जैसे रहे हो और जैसे रहोगे, मैं आपसे उसी रूप में बहुत प्यार करती हूं.'" हे फोटो पाहून काही लोक या जोडप्याचे कौतुक करत आहेत. तर काही सोशल मीडिया युजर्सनी अंकिताबाबत अंदाज व्यक्त केला आहे की ती pregnant आहे.

fallbacks

या फोटोंमध्ये अंकितच्या पोटावर हात दिसत आहे, तसेच विकीही तिला सपोर्ट करत आहे. अशा परिस्थितीत सर्वजण अंकिताच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करत आहेत. मात्र, तिच्या प्रेग्नेंसीच्या वृत्तावर अंकिताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

fallbacks

एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीला विचारले, "तू गरोदर आहेस का?" तर दुसऱ्या नेटिझनने तर ती प्रेग्नंट असल्याचा 100 टक्के दावा केला आहे. युजरने लिहिले की, "ती 100 टक्के प्रेग्नंट आहे." त्याचवेळी, इतर यूजर्सनी देखील कमेंट करताना  pregnantबद्दल प्रश्न विचारले आहेत.

fallbacks

दरम्यान, अंकिताच्या प्रेग्नेंसीची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, जेव्हा अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिच्या लग्नाच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले होते, तेव्हाही गpregnantबद्दल अंदाज लावला जात होता. मात्र, अद्याप अंकिता आणि विकीच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही. 

fallbacks

यावेळी अंकिता लोखंडे हिचा बोल्ड लूकही तिच्या चाहत्यांना भावला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने ब्लू कलरचा बॅकलेस स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे. 

fallbacks

14 डिसेंबर 2021 रोजी अंकिता आणि विकी हे दोघे विवाहबंधात अडकलीत.  अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या लग्नाच्या सहा महिन्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही फोटोंची मालिका शेअर केली आहे. या फोटोंमध्ये ते रेड वेल्वेट केक कापताना आणि एकमेकांना आनंदाने खाऊ घालताना दिसत आहेत.

Read More