Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मला घटस्फोट दे, मला जे पाहिजे ते...'; अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं लग्न धोक्यात

Ankita Lokhande wants divorce from Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या जेव्हापासून 'बिग बॉस 17' मध्ये गेले आहेत. तेव्हा पासून त्या दोघांची सतत भांडणं होत आहेत. 

'मला घटस्फोट दे, मला जे पाहिजे ते...'; अंकिता लोखंडे आणि विकी जैनचं लग्न धोक्यात

Ankita Lokhande wants divorce from Vicky Jain : सध्या सोशल मीडियावर छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 17' ची चर्चा सुर आहे. रोज बिग बॉसच्या घरात काही ना काही सुरु असतं. कधी स्पर्धकांचं तर कधी नवरा-बायकोचं. या सीजनमधील नवरा-बायकोची भांडण ही चर्चेचा विषय ठरत आहेत. तर नुकत्याच नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये खूप मोठं भांडण झालं. त्यात विकी जैनला आयशासोबतचं भांडण हे खूप महागात पडलं आहे. विकी आणि आयशानं मस्करीत काही अशा गोष्टींवर चर्चा केली की त्या गोष्टी अंकिताला आवडल्या नाही. इतकंच नाही तर तिनं थेट विकीला घटस्फोट देण्याचं वक्तव्य केलं. 

खरंतर, आयशा आणि विकी हे दोघे त्याच्या वैवाहिक आयुष्यावर चर्चा करत होते. आयशानं थेट विकीला त्याच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न विचारला. त्यावर विकी उत्तर देत म्हणाला की वैवाहिक पुरुष कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करतो हे कधीच सांगू शकत नाही. यावर आयशा म्हणाली की 'ती आता लग्न करणार नाही. ती तिच्या वडिलांमुळे लग्न करणार नाही. त्यानंतर अंकिता विकीला विचारते की त्यानं असं वक्तव्य का केलं?'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यावर उत्तर देत विकी म्हणाला की, 'मी कधीच सांगू शकणार नाही की मला काय वाटतं. मी कोणत्या गोष्टींचा सामना करतो. वैवाहिक व्यक्ती त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक पुरुषाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. त्यावर अंकिता लगेच म्हणते की सांग तू काय सहन करतोयस माझ्याबद्दल, जर तू इतकंच मला सहन करतोयस, तर माझ्यासोबत का राहतोस. घटस्फोट घेऊया. मला तुझ्यासोबत घरी जायचं नाही.' 

हेही वाचा : गॅंगस्टर होते अजय देवगनचे वडील! वयाच्या 13 व्या वर्षी सोडलं होतं घर; अभिनेत्याचाच खुलासा

विकीला घटस्फोट दे म्हटल्यानंतर अंकिता आयशाशी बोलते की 'मला माहिती आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो, पण मला त्याच्याकडून जे पाहिजे त्या मला मिळत नाही आहेत. अनेकदा मला असं वाटलं की तो मला कंट्रोल आणि डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. मी पाहिलं की जेव्हा पण माझं भांडण कोणत्या पुरुष स्पर्धकासोबत भांडण होतं तेव्हा ती मला कशा प्रकारे थांबवतो.' दरम्यान, आता शो संपेपर्यंत विकी आणि अंकिता याचं नातं कुठपर्यंत जातं हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

Read More