Marathi News> मनोरंजन
Advertisement

अखेर अंकिता लोखंडेने लग्नगाठ बांधली, पाहा व्हिडिओ

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाचा सध्या सोशल मीडियावर चागंलाच बोलबाला आहे.

अखेर अंकिता लोखंडेने लग्नगाठ बांधली, पाहा व्हिडिओ

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाचा सध्या सोशल मीडियावर चागंलाच बोलबाला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सतत समोर येत आहेत. नुकतच या कपलने सात फेरे घेतले आहेत. यावेळी नातेवाईकांनी दोघांवरही गुलाबपुष्पांचा वर्षाव केला आहे. सात फेऱ्या घेतानाही विकी सतत अंकिताला संभळताना दिसत होता.

अंकिताच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्रीने विकी जैनचा हात किती प्रेमाने पकडला आहे आणि दोघेही आग्नीसाक्षी सात फेरे घेताना दिसत आहेत. गोल्डन लेहेंगा घातलेल्या अंकिताच्या चेहऱ्यावरून नजर हटवणं कठीण होईल एवढं मात्र नक्की. या व्हिडिओमध्ये मात्र विकी जैन तिचा लेहेंगा सतत सांभाळताना दिसत आहे. 

दोघांमध्ये लग्नाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. फेऱ्यांदरम्यान, अचानक विक्की पॅव्हेलियनवर हात उचलतो आणि नाचू लागतो तेव्हा सगळेचजण उत्साहित होतात. त्यांचा लग्नाचा मंडपदेखील अतिशय सुंदर सजवला आहे. लाल-पांढऱ्या फुलांनी सभोवताली सजावट केलेली दिसतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी आणि अंकिताच्या लग्नात फार कमी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दोन्ही कुटुंबातील फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. यापूर्वी विकी जैनने विंटेज कारमध्ये ढोलताशांच्या गजरात अंकितासाठी वरात घेवून आला होता.  त्यानंतर दोघांचा वरमाळा सोहळा पार पडला. वरमाळाच्या वेळीचं ते दृश्य अतिशय भव्य होतं. शंख आणि मंदिराच्या घंटांच्या आवाजात अंकिता आणि विकीने एकमेकांना पुष्पहार घातला. त्यानंतर दोघांनी पुढचे विधी करत लग्नगाठ बांधली.

Read More