Marathi News> मनोरंजन
Advertisement

Animal Teaser : 'हम ने क्रिमिनल पैदा किया हैं' कधीच पाहिला नसेल रणबीरचा असा अवतार!

Animal Teaser : रणबीर कपूरच्या 'एनिमल' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रणबीरचा कधीही न पाहिलेला लूक समोर... 

Animal Teaser : 'हम ने क्रिमिनल पैदा किया हैं' कधीच पाहिला नसेल रणबीरचा असा अवतार!

Animal Teaser : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 41वा वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी 'एनिमल' या चित्रपटातील फस्ट लूक प्रदर्शित केला होता. तर आज रणबीरच्या  वाढदिवसानिमित्तानं 'एनिमल' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या टीझरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. कारण रणबीरचा न पाहिलेला लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात असं वेगळं काय पाहायला मिळणार असा प्रश्न पडला असेल तर एकदा टीझर पाहाच...

रणबीरच्या या चित्रपटाचा टीझर हा 2 मिनिट 26 सेकंदाचा आहे. टीझरच्या सुरुवातीला दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि रणबीर दिसत आहेत. यावेळी रश्मिका रणबीरला विचारते की कधी मुलांचा विचार केला आहेस? त्यावर उत्तर देत रणबीर बोलतो हो, मला वडील व्हायचे आहे. त्यावर लगेच रश्मिका बोलते की पण तू तुझ्या वडिलांसारखा नाही होणार नाही. त्यानंतर रणबीर कपूर आश्चर्य चकीत झाल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर अनिल कपूर हे रणबीरला कानशिलात लगावताना दिसतात. तर रणबीर हा खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळते. वडिलांनी इतकं मारलं असलं तरी रणबीर हसताना दिसतो. दुसरीकडे अनिल पत्नीला ओरडत बोलताना दिसतात की आपण एका गुंडाला जन्म दिला आहे. त्यानंतर एक श्रीमंत मुलाचं आयुष्य कसं असायला हवं यावर अनेक लोक रणबीरला सांगताना दिसतात. तर अनिल कपूर त्याला सांगतात की मला याची कल्पना आहे की मी काही चुका केल्या आहेत. मुलाला कशी शिकवण द्यावी हे मला जमलं नाही. तर त्यावर रणबीर बोलताना दिसतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मला ट्रेन केलं आहेस. यानंतर रणबीरचा कधी न पाहिलेला लूक आपल्याला पाहायला मिळतो. टीझरच्या शेवटी बॉबी देओलचा एक वेगळाच लूक पाहायला मिळतो. 

हेही वाचा : डॅशिंग अभिनेत्री स्मिता गोंदकर आयुष्यभर करणार नाही लग्न! कारण तिनंच सांगितलं

टीझरमधील रणबीर आणि बॉबी देओलच्या ट्रांसफॉर्मेशनला पाहून चाहते आश्चर्य चकीत झाले आहेत. या चित्रपटात अनिल कपूर हे रणबीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहे. तर रश्मिका ही गीतांजलीच्या भूमिकेत असून ती रणबीरची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. 

दरम्यान, रणबीर आणि रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रणबीरचा गेल्या वर्षी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसला होता. तर या वर्षी त्याचा श्रद्धा कपूरसोबत 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट पाहायला मिळाला होता. तर रणबीरच्या खासगी आयुष्याविषयी म्हणायचे झाले तर गेल्या वर्षी आलिया आणि त्यानं लग्न केलं. तर त्याच वर्षी त्यांच्या आयुष्यात राहा आली. नोव्हेंबर महिन्यात त्यांची लेक राहाचा जन्म झाला. रश्मिका विषयी बोलायचे झाले तर ती 'एनिमल' या चित्रपटाशिवाय तिच्याकडे आणखी अनेक प्रोजेक्ट्स असून 'पुष्पा 2' त्यापैकी एक आहे.

Read More