Marathi News> मनोरंजन
Advertisement

झक्कास! युरोपमध्येही अनिल कपूर यांच्या नावाचा डंका

'यूरोप डे'साठी अनिल कपूर यांची विशेष उपस्थिती

झक्कास! युरोपमध्येही अनिल कपूर यांच्या नावाचा डंका

मुंबई : एव्हरग्रीन बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर त्यांच्या फिटनेसमुळे, त्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अनिल कपूर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. अनिल कपूर यांना 'यूरोप डे' समारंभात सन्मानित केलं जाणार आहे. 'यूरोप डे' समारंभात भारतातील यूरोपीय संघाचे एक प्रतिनिधिमंडळ आणि काउन्सिल ऑफ यूरोपियन यूनियन चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे येत्या शुक्रवारी अनिल कपूर यांना सन्मानित केलं जाणार आहे. 

अनिल कपूर 'यूरोप डे' या समारंभासाठी प्रमुख पाहुणे असणार आहेत. याशिवाय भारतातील यूरोपीय संघाचे राजदूत टॉमाज कोज्लोस्की, यूरोपीय संघाचे राजनायिक दूत आणि यूरोपीय तसेच भारतीय कॉर्पोरेट जगातील वरिष्ठ प्रतिनिधीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

fallbacks

यूरोपियन यूनियनच्या संघाला चिन्हांकित करण्यासाठी दरवर्षी ९ मे रोजी 'यूरोप डे' साजरा केला जातो. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'संपूर्ण देशातील लहान मुलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, यूरोपीयन संघाला मदत करण्याबाबत आणि भारतात मुलींच्या अधिकारांसाठी योजना बनवण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी' अनिल कपूर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

'टोटल धमाल' की सफलता से खुश अनिल कपूर बोले, 'बेहतर काम करने की तमन्ना रखता हूं'

भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी यूरोप नेहमीच पहिली पसंती असल्याचं बोललं जातं. भारतीय चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी कशाप्रकारे भारतीय निर्माते यूरोपला पसंती देतात याबाबतही या कार्यक्रमात प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 

Read More