Marathi News> मनोरंजन
Advertisement

'प्रेम से बोलो...', Amruta Fadnavis यांच्या नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Amruta Fadnavis यांची नवीन पोस्ट तुम्ही पाहिली? म्हणतायेत, 'प्रेम से बोलो...'  

'प्रेम से बोलो...', Amruta Fadnavis यांच्या नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम चर्चेत असतात. कधी ट्विट तर कधी एखाद्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात असतात  (Amruta Fadnavis social media) . पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण आहे संगीत... दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

यंदाची दिवाळी आणि लक्ष्मी पुजनाचं (diwali lakshmipujan) निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी नवीन गाणं प्रदर्शित केलं आहे. सध्या त्यांच्या नव्या गाण्याची सर्वत्र चर्चा आहे. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल ॐ जय लक्ष्मी माता  असे आहेत. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अनेक भक्त देवीची पुजा करताना दिसत आहेत. 

“दिवाळी 2022 आणि लक्ष्मी पूजेच्या शुभप्रसंगी माझी लक्ष्मी मातेसाठीची आरती ऐका आणि देवीच्या भक्तीत तल्लीन व्हा, प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता …!” असे कॅप्शन त्यांनी या ट्वीटला दिले आहे. अमृता फडणवीस यांनी गायलेले हे गाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे. पाहा अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं. 

सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची चर्चा आहे. युट्यूबवर त्यांच्या नव्या गाण्याला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय अनेकांनी कमेंट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Read More