Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन आज अभिनेते नसते तर, मुंबईच्या रस्त्यांवर...

कोट्यवधींच्या घरात राहणाऱ्या बिग बींना जेव्हा मरीन ड्राइव्हवर काढावी लागली रात्र  

अमिताभ बच्चन आज अभिनेते नसते तर, मुंबईच्या रस्त्यांवर...

मुंबई : आज कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या देशात महानायक अमिताभ बच्चन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. फक्त देशातचं नाही तर, परदेशात देखील बिग बींच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. आज अमिताभ बच्चन म्हणजे बॉलिवूड असं म्हणायला हरकत नाही. बिग बींकडे आज प्रसिद्धी, मान, सन्मान सर्व काही आहे. पण हे यश मिळवण्यासाठी त्यांना आयुष्यात खस्ता खावा लागला. 

वयाच्या 23 व्या वर्षी अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. दरम्यान अमिताभ बच्चन यांची कंपनी ABCL (Amitabh Bachchan Corporation Ltd) कर्जबाजारी झाली होती. 

एका मुलाखतीत बिग बींनी सांगितलं की, 'मुंबईत आल्यानंतर मला जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी ऑफर यायच्या. एका जाहिरातीसाठी मला 10 हजार रूपये मानधन मिळायचं. तेव्हा 10 हजार म्हणजे मोठी रक्कम होती...'

ते पुढे म्हणाले, 'मी जाहिरातींसाठी काम करत होतो. पण मला असं वाटायचं माझ्यापासून काही तरी दूर जात आहे. त्यामुळे मी जाहिरातींसाठी नकार द्यायला लागलो.... '

जाहिरातींमध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर बिग बींकडे राहायला देखील जागा नव्हती. मित्रांकडे तरी किती दिवस थांबणार, तेव्हा बिग बींनी काही दिवस आणि रात्र मरीन ड्राइव्हवर काढले. 

अभिनेते नसते तर आज बिग बी...
बिग बी म्हणाले, 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडे फक्त ड्रायव्हींग लायसेंस होतं. जर मी अभिनय क्षेत्रात नसतो, तर मुंबईच्या रस्त्यांवर कॅब चालवत असतो. पण माझं स्वप्न अभिनय होतं....' आज अभिनय क्षेत्रात बिग बी अनेकांची प्रेरणा आहेत. 

Read More