Marathi News> मनोरंजन
Advertisement

वडिलांची 'ती' अट, ज्यामुळे अमिताभ आणि जया अडकले विवाह बंधनात

वडिलांची 'ती' अट पूर्ण करण्यासाठी अमिताभ यांना करावं लागलं जया बच्चन यांच्यासोबत लग्न, त्यानंतर...  

वडिलांची 'ती' अट, ज्यामुळे अमिताभ आणि जया अडकले विवाह बंधनात

मुंबई : बॉलिवूडमधील बेस्ट कपल कोण? असा प्रश्नसमोर आला तर प्रत्येकाचं उत्तर महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हेच असेल. कारण झगमगत्या विश्वात कधी कोणत्या नात्याचा अंत होईल, सांगता येत नाही. पण बिग बी आणि जया यांची जोडी गेले अनेक वर्ष चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत. आजही त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से समोर येत असतात. 

बिग बी आणि जया यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबॉस्टर ठरले. 1973 साली त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळपास 49 वर्ष झाली आहेत. 

fallbacks

एकेकाळी बॉलिवूडला एका पेक्षा एक सिनेमे देणारी ही जोडी खऱ्या आयुष्यात देखील हीट ठरली. जया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी अभिनयास सुरूवात केली. 

जया यांनी सत्यजीत रे दिग्दर्शित 'बांग्ला' सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. बिग बी यांनी 'सात हिंदुस्तानी' सिनेमातून पदार्पण केलं. पण त्यांचा पहिला सिनेमा अपयशी ठरला. 

fallbacks

जया आणि बिग बी यांची ओळख 'गुड्डी' सिनेमाच्या सेटवर झाली. ऋषिकेश मुखर्जी यांनी दोघांची ओळख करून दिली. याचदरम्यान जया आणि  बिग बी यांच्या नात्याला सुरुवात झाली. 

fallbacks

fallbacks

त्यानंतर 1973 मध्ये आलेल्या 'जंजीर' सुपरहिट सिनेमापर्यंत दोन्ही दिग्गजांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. 'जंजीर' सिनेमातही जया आणि अमिताभ यांची जोडी एकत्र दिसली होती. सिनेमाच्या यशानंतर अमिताभ आणि जया रातोरात मोठे स्टार बनले.

सिनेमा हिट ठरला तर संपूर्ण टीमचं लंडनला फिरायला जायचं असं देखील ठरलं. अशी माहिती बिग बींनी वडील डॉ हरिवंश राय यांना दिली. पण हरिवंश राय यांनी बिग बींसमोर एक अट ठेवली. जयासोबत लग्न कर त्यानंतर फिरायला जा... अशी अट त्यांनी बिग बीं समोर ठेवली.

त्यांनंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी लग्न केलं आणि लंडनला सर्वांसोबत फिरायला गेले. 3 जून 1973 रोजी बिग बी आणि जया यांनी लग्न केलं.  आज देखील दोघांच्या प्रेमाचे किस्से तुफान रंगत असतात. 

Read More