Marathi News> मनोरंजन
Advertisement

नवी चप्पल डोक्याखाली ठेऊन झोपायचा 'हा' अभिनेता

'या' अभिनेत्याला अनेक जण फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.

नवी चप्पल डोक्याखाली ठेऊन झोपायचा 'हा' अभिनेता

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांना यांच्या कपड्यांपासून, अॅक्सेसरिजपर्यंत अनेक जण फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. बिग बींकडे आज कित्येक महागडे कपडे, फुटवेअर, अॅक्सेसरिज असतील. पण तुम्हाला माहितीये का? बॉलिवूडचे हेच महानायक एकेकाळी आपल्या नवीन चपला डोक्याखाली ठेऊन झोपत असत. खुद्द बिग बींनी याबाबतची कहाणी सांगितली आहे.

अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या शोमध्ये एका स्पर्धकाची संघर्षमय कहाणी ऐकून अमिताभ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना, त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक समस्यांचा सामना केल्याचं सांगितलं. 

रिअॅलिटी शोच्या माध्यमातून त्यांनी, त्यांच्या बालपणातील संघर्षाची आठवणही करुन दिली. याबाबत बोलताना त्यांनी, 'आम्ही शाळेत असताना एक क्रिकेट टीम असायची, ज्याच्या सदस्यत्वासाठी २ रुपये भरावे लागत. त्यावेळी माझ्याकडे २ रुपयेही नसायचे. जर आम्ही नवीन चप्पल खरेदी करण्यासाठी गेलो आणि ती आम्हाला मिळाली तर ती नवीन चप्पल आम्ही डोक्याखाली ठेऊन झोपत असल्याची' आठवण त्यांनी सांगितली. 

या शोमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या संपत्तीच्या वाटणीबाबतही खुलासा केला. त्यांच्या संपूर्ण संपत्तीवर केवळ अभिषेकचा अधिकार नसून, संपत्तीतील अर्धा वाटा हा त्यांच्या मुलीचा, म्हणजेच श्वेताचा असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Read More