Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन यांनी 'बधाई हो' बघून या अभिनेत्रीचं केलं कौतुक

पाहा हा फोटो 

अमिताभ बच्चन यांनी 'बधाई हो' बघून या अभिनेत्रीचं केलं कौतुक

मुंबई : अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील एक असे कलाकार आहेत जे आपल्या सहकलाकारांच कायमच कौतुक करत असतात. बॉलिवूडमधील महानायक अनेकदा नवीन कलाकारांच काम बघून त्याचं कौतुक करतात. कुणाचं काम विशेष आवडलं तर ते शुभेच्छा देण्यासाठी फूल पाठवून त्यांच खास कौतुक करतात. अशाच पद्धतीने आता बिग बींनी एका दिग्दर्शकाचं आणि सिनेमातील अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. 

अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक अमित शर्मा यांचा 'बधाई हो' हा सिनेमा पाहिला. या सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता आणि दिग्दर्शक यांच फूल आणि एक पत्र पाठवून खास कौतुक केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी हे पत्र स्वतः आपल्या हातांनी नीना गुप्ता यांच्यासाठी लिहीलं आहे.

आणि याचा फोटो  नीना गुप्ता यांनी स्वतः ट्विटरवर शेअर केला आहे. तुमचं पत्र आणि फुलं मिळाली.... डोळे आनंदांनी भरून आले... खूप खूप धन्यवाद सर.... 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aapse ye patr aur pushp pa ke ankhen khushi se bhar aaeen thank u so much @amitabhbachchan sir #BadhaaiHo

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

तर सिनेमाचा दिग्दर्शक म्हणाला की, अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक झाल्यानंतर खूप खास वाटत आहे. दिग्दर्शकाने फोटो शेअर करताना म्हटलं की, दिग्गज जेव्हा आपल्या कामाचं कौतुक करतात तेव्हा खूप खास वाटतं. बिग बींच्या कौतुकामुळे मी स्वतःला खूप खास समजत आहे. 

Read More