Marathi News> मनोरंजन
Advertisement

बरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन

मुंबई : रूग्णालयात उपचार घेतल्यावर बीग बी अमिताभ बच्चन यांनी एक भावनीक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपले कोण हे समजल्याचे म्हटले आहे. 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मध्यरात्री केले ट्विट

दरम्यान, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांची पत्नी जया बच्चन यांनीही सांगितले होते. मात्र, त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रकृतीची चौकशी सुरूच ठेवली होती. चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेली विचारपूस पाहून भावूक झालेल्या बच्चन यांनी मध्यरात्री एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये कवितेतून व्यक्त केल्या भावना

मध्यरात्री केलेले ट्विटमध्ये अमिताभ यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.   प्रकृती बिघडल्याचा कवितेत उल्लेख करतानाच, काळजी करणाऱ्या चाहत्यांचाही बच्चन यांनी कवितेत उल्लेख केला आहे.

बच्चन यांची प्रकृती ठणठणीत

दरम्यान, अचानक वाढलेल्या तापमानामुळे बच्चन यांची प्रकृती बिघडल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. सध्या अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम असून ते आज शूटिंगसाठी सेटवर परतणार आहेत.

Read More