Marathi News> मनोरंजन
Advertisement

Amitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?

Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्‍या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?

 Amitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?

Amitabh Bachchan & Politics: बॉलिवूडचा शहेनशाह. शतकातील नायक. एंग्री यंगमॅन. बिग बी. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस साजरा (Happy Birthday Amitabh Bachchan) करत आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी ही जगजाहीर आहे. त्याशिवाय अमिताभ बच्चन आणि गांधी कुटुंब यांचं जवळचं नातं होतं हे अनेकांना माहिती नाही. आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण अमिताभ बच्चन, गांधी कुटुंब आणि राजकारण या समीकरणाबद्दल जाणून घेऊयात.

इंदिरा गांधी तिसरा मुलगा मानायची (Third Son of Indira Gandhi)

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) त्यांना आपला तिसरा मुलगा मानत होत्या. 'कुली'(Coolie) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन (#80saalbemisaalbachchan) यांना पोटात गंभीर दुखापत झाल्यामुळे इंदिरा गांधींनी त्यांचा दौरा रद्द केला होता. गांधी घराण्यात अमिताभ बच्चन यांचं महत्त्व काय होतं ते यावरून कळंलच असेल. इंदिरा गांधी आणि बिग बी यांची आई तेजी बच्चन या दोघी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. (Amitabh Bachchan gandhi family and politics Mulayam Singh Yadav Amar Singh nmp)

राजीव गांधींमुळे बिग बी राजकारणात (Amitabh Bachchan-Rajiv Gandhi Friendship) 

अमिताभ बच्चन यांनी त्यांचे बालपणीचे मित्र राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या सांगण्यावरून राजकारणात प्रवेश केला. 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या (Indira Gandhi Murder) झाली तेव्हा राजीव गांधींना पंतप्रधान व्हावे लागले. राजीव गांधींच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात प्रवेश (Amitabh Bachchan in Politics)केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात अलाहाबादमधून लोकसभेसाठी (Allahabad Lok Sabha Seat) फॉर्म भरला. हेमवती नंदन बहुगुणा  (Hemvati Nandan Bahuguna) आणि त्यांचे समर्थक अमिताभ बच्चन यांना नाचनिया म्हणत त्यांची खिल्ली उडवत होती.

fallbacks

इतकी जवळची मैत्री तुटली...

इंदिरा गांधींच्या तिसर्‍या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत? खरं तर राजकारणाने गांधी आणि बच्चन कुटुंबात मोठी भिंत निर्माण केली. अशी भिंत की बच्चन कुटुंबाला आता गांधी घराण्याच्या कार्यक्रमांना बोलावलं जात नाही. गांधी घराण्यातील कोणीही बच्चन कुटुंबीयांच्या घरी जात नाही. राजीव गांधींच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन राजकारणाच्या क्षेत्रात उतरले, पण त्या राजकारणाने त्यांना त्यांचं मित्र आणि देशातील सर्वात शक्तिशाली राजकीय कुटुंबापासून दूर केलं.

fallbacks

बोफोर्स प्रकरणामुळे राजकारणाला गुडबाय (Good Bye)

बोफोर्स घोटाळ्यात (Bofors Scam) अमिताभ बच्चन यांचं नाव जाणूनबुजून घातल्याचं बोललं जात आहे. यामुळे अमिताभच्या आयुष्यात एक काळ वादळ निर्माण झालं आणि अमिताभ बच्चन यांनी राजकारणाला गुड बाय म्हटलं. पुढे त्यांची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकवेळा राज्यसभेच्या खासदार झाल्या, पण बिग बींनी राजकारणाकडे मागे वळून पाहिले नाही. पुन्हा राजकारणात परतले नाहीत.

अमर सिंग यांच्याशीही घट्ट मैत्री होती

अमिताभ बच्चन यांचा आणखी एक जवळचे मित्र म्हणजे अमर सिंग (Amar Singh). काँग्रेस (Congress) पक्षातून राजकारणात प्रवेश केलेले अमिताभ बच्चन यांना सर्वच पक्षांचे लोक मान देतात, परंतु मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाशी (एसपी) त्यांचं सखोल संबंध होते. अमिताभ बच्चन यांना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सरकारच्या अनेक मोहिमांचा चेहरा बनवण्यात आलं होतं. समाजवादी पक्ष आणि अमिताभ बच्चन यांचं संबंध केवळ जाहिरातींपुरते मर्यादित होते. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (Amitabh Bachchan Corporation Limited)(ABCL) मुळे दिवाळखोरीत निघालेल्या बिग बी यांना अमर सिंह यांनी तारलं होतं. अमर सिंह यांच्यामुळेच अमिताभ यांना 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या रिअॅलिटी शोमध्ये अँकरची संधी मिळाली आणि बिग बी आपलं कर्ज फेडू शकले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पुन्हा मजबूत झाली.

fallbacks

आणि मुलायम सिंह बिग बी यांच्या घरी गेले

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं (Mulayam Singh Yadav passed away) सोमवारी सकाळी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital)  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळ गावी सैफईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन आणि मुलायम सिंह यादव यांचं कुटुंब एकेकाळी खूप जवळचे (Mulayam Singh Yadav's family) होते. मग अशी वेळही आली की नात्यात दुरावा आला. 

जेव्हा ही मैत्री फुलली तेव्हा 1994 मध्ये यूपीचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी अमिताभ बच्चन यांचे वडील आणि प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांना यूपीच्या यश भारती पुरस्काराने (Yash Bharati Samman) सन्मानित करण्याची घोषणा केली. मात्र सत्कार सोहळ्यापूर्वीच हरिवंशराय बच्चन यांची प्रकृती खालावली. या कार्यक्रमासाठी ते लखनौला येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. सीएम मुलायम सिंह यादव यांना याची माहिती मिळताच ते तात्काळ विमानाने मुंबईतील जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि स्वतः हरिवंशराय बच्चन यांचा सत्कार केला.

fallbacks

Read More