Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतरही अमिताभ बच्चन यांची मुलगी पडली होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात, म्हणून बच्चन कुटुंबियांनी तिला थेट...

बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंब नेहमीच वाद टाळण्याचा आणि त्यापासून दूर राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.

लग्नानंतरही अमिताभ बच्चन यांची मुलगी पडली होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात, म्हणून बच्चन कुटुंबियांनी तिला थेट...

Shweta Bachchan-Nanda: महानायक आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध बच्चन कुटुंबाबद्दल एखादी गोष्ट समोर आली की, सर्व जगाच्या भुवया उंचावल्या जातात. बच्चन कुटुंबातील प्रत्येक जणांने बॉलिवूडमध्ये आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमिताभ बच्चन असो किंवा जया बच्चन, अभिनषेक बच्चन असो किंवा ऐश्वर्या या चौघांनी एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. 

बच्चन कुटुंबाची लाडकी मुलगी श्वेता बच्चन-नंदा (Shweta Bachchan) ही एकमेव व्यक्ती आहे जिने अभिनय क्षेत्रापासून स्वत:ला दूर ठेवलं. तिचं लहान वयात लग्न झालं होतं. गेल्या काही वर्षात श्वेता अनेक वेळा मुंबईत दिसल्यामुळे तिच्या संसार नीट सुरु आहे की नाही, अशी चर्चा रंगली होती. दुसरीकडे  हृतिक रोशन त्याची पत्नी सुजैनपासून विभक्त झाला होता. त्यानंतर त्याची श्वेता बच्चनसोबतची जवळीक खूप वाढली होती. (Amitabh Bachchan daughter Shweta Bachchan fell after marriage in love with actor Hrithik Roshan Bollywood Gossip) 

खरंतर, एकदा शूटसाठी श्वेता अभिषेकला सोडायला आला होता, त्यानंतर अभिषेक आणि श्वेता हृतिकला (Hrithik Roshan) भेटायला गेले होते. अभिषेक त्याच्या कामात व्यस्त असायचा पण श्वेता अनेकदा हृतिकला भेटायला जायची आणि त्याच्यासोबत वेळ घालवायची.

श्वेता, अभिषेक आणि हृतिक लहानपणापासूनच मित्र आहेत. तिघेही एकत्र वाढले आणि शिकले. पण पुढे दोघांची जवळीक खूप वाढली होती, त्यानंतर हृतिकची पत्नी सुसानला खूप वाईट वाटू लागलं होतं. हृतिक आणि सुझैन वेगळे झाले असले तरी तिला श्वेता आणि हृतिकची जवळीक कधीच आवडली नाही.

एकेकाळी श्वेता दिल्लीहून मुलांसह मुंबईत आली होती आणि त्यानंतर लवकरच हृतिक आणि श्वेताची जवळीक चर्चेत येऊ लागली आणि ट्रेंडमध्येही आली. बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंब नेहमीच वाद टाळण्याचा आणि त्यापासून दूर राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. त्यामुळे या चर्चेनंतर श्वेताने हृतिकपासून दूर राहणे पसंत केले आणि ती हळूहळू हृतिकपासून वेगळी झाली. आता ती तिच्या पतीसोबत दिल्लीतच हॅप्पी मॅरिड लाइफ घालवत आहे.

Read More