Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aishwarya Rai ने नणंदबाईंसोबत घातला वाद? अमिताभ बच्चन यांनी अखेर करून दिली मालमत्तेची वाटणी

Aishwarya Rai : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल असतं. पण, अनेकदा याच कुटुंबांमध्ये सुरु असणारी धुसफूस समोर आली की अनेकांचेच डोळे चमकतात.   

Aishwarya Rai ने नणंदबाईंसोबत घातला वाद? अमिताभ बच्चन यांनी अखेर करून दिली मालमत्तेची वाटणी

Aishwarya Rai: असं म्हणतात की, एखाद्या व्यक्तीसाठी कुटुंब म्हणजे मोठा आधार. कुटुंब आनंदात म्हटलं की, सर्वच गोष्टींमध्ये आपोआपच सकारात्मकता अनुभवता येते. कलाविश्वाविषयी सांगावं, तर इथं काही अशी कुटुंब आहेत ज्यांच्याकडे पाहताना अनेकांनाच हेवा वाटतोय. यातलंच एक म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं कुटुंब. एखादा सण म्हणू नका किंवा मग एखादा समारंभ. बच्चन कुटुंबाच्या लेकिसुना एकत्र हजेरी लावत त्या कार्यक्रमांची शोभा वाढवताना दिसतात. पण, ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.... तेच इथंही लागू होतं. 

बिग बींच्या कुटुंबात काहीतरी बिनसलंय? 

अशा चर्चा आहेत की अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Net Worth) यांच्या कुटुंबात सध्या काहीसा तणाव आहे. माध्यमांसमोर ही मंडळी सर्वकाही व्यवस्थित असल्याचं भासवताना दिसले तरीही प्रत्यक्षात मात्र तसं नाही. किंबहुना असंही म्हटलं जातंय की याच मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बिग बींनी त्यांच्या एकूण संपत्तीची वाटणी अनेक भागांमध्ये केली आहे. 

हेसुद्धा पाहा : Alia Bhatt- Ranbir Kapoor: लेकिला घेऊन आलिया- रणबीर पहिल्यांदाच निघाले फिरायला, चिमुकलीचे असंख्य Photos व्हायरल 

 

सूत्रांच्या माहितीनुसार हल्लीच अमिताभ यांनी एक मोठं वक्तव्य केलं. जिथं त्यांनी आपल्या संपत्तीचा वासरदार फक्त मुलगा अभिषेक (abhishek bachchan) नसेल असं स्पष्ट सांगितलं. बिग बींच्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीच्या दोन वाटण्या होतील. यातला एक भाग श्वेता, तर दुसरा भाग अभिषेकला दिला जाईल. थोडक्यात बच्चन यांच्या तब्बल 2800 कोटी रुपयांच्या संपत्तीतून 1400 कोटी रुपयांचा एक भाग अभिषेक आणि दुसरा 1400 रुपयांचा भाग श्वेताला देण्यात येईल. 

श्वेता आणि ऐश्वर्यामध्ये खरंच वादाची ठिणगी? (Shweta bachchan Aishwarya rai bachchan)

श्वेतानं अभिषेक बच्चनसोबत निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं ऐश्वर्याविषयीसुद्धा वक्तव्य केलं होतं. 'मला तिची (ऐश्वर्याची) एक सवय आवडत नाही, ते म्हणजे तिचं वेळेचं व्यवस्थापन ठीक नसतं....', असं श्वेता म्हणाली होती. त्यामागोमागच पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या आणि श्वेता एकमेकिंना टाळताना दिसल्या होत्या. हा तोच क्षण होता जेव्हापासून त्यांच्या नात्यात आलेला दुरावा सर्वांसमोर आला होता. 

Read More