Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ यांनी शेअर केला तेलगू सिनेमातील लूक....

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आजवरच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 

अमिताभ यांनी शेअर केला तेलगू सिनेमातील लूक....

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आजवरच्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्यांचे फॅन्स आहेत. आता लवकरच अमिताभ बच्चन साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी यांच्या तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात ते पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. शूटिंगसाठी ते हैद्राबादला रवाना झाले आहेत.

फोटो केला शेअर

चिरंजीवी यांच्या सई रा नरसिम्हा रेड्डी यांच्या सिनेमात अमिताभजी दिसणार आहेत. या सिनेमाची कहाणी स्वतंत्रता सेनानी यू नरसिम्हा रेड्डीच्या जीवनावर आधारित आहे. याचा खूलासा अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवरुन केला. इतकंच नाही तर त्यांनी आपला सिनेमातील लूक ही शेअर केला. पहा सिनेमातील त्यांचा अनोखा लूक...

ब्लॉगमधून केला खुलासा

हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, हा त्यांचा फायनल लूक नाही आहे. पण असाच काहीतरी लूक असेल. 

fallbacks

(फोटो सौजन्य- amitabhbachchan'sblog)

या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

काही दिवसांपूर्वीच 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' च्या शूटिंग दरम्यान त्यांची तब्बेत बिघडली. त्यामुळे त्यांना जयपूरहून परतावे लागले. मात्र आता त्यांची तब्बेत ठीक असून ते सध्या १०२ नॉट आऊटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा ४ मे ला प्रदर्शित होणार आहे. यात अमिताभ यांच्यासोबत ऋषी कपूरही प्रमुख भूमिकेत आहेत.  

 

 
Read More